शहरातील साथीच्या आजारासंदर्भात आरोग्य विभागाची घेतली बैठक अहमदनगर | नगर सह्याद्री नगर शहरांमध्ये सध्या साथीच्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाण...
शहरातील साथीच्या आजारासंदर्भात आरोग्य विभागाची घेतली बैठक
अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर शहरांमध्ये सध्या साथीच्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. तरी मनपा आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना करून आरोग्य सुविधा द्यावेत मनपा आरोग्य विभागाच्या आरोग्य सुविधा फक्त कागदावर न ठेवता सर्वसामान्य जनतेपर्यंत घरोघरी जाऊन पोहोचाव्यात ५० कर्मचार्यांची टीम करून प्रभाग क्रमांक १ पासून औषध फवारणी व प्रभाग क्रमांक १७ पासून धूर फवारणी ची सुरुवात करावी. प्रभागातील कोणताही परिसर फवारणीतून सुटणार नाही. याची काळजी आरोग्य अधिकार्यांनी घ्यावी याकरता संबंधित वार्डातील नगरसेवकांचे सहकार्य घेतले जाईल औषध फवारणीसाठी आरोग्य अधिकार्यांनी ताबडतोब औषधाचा साठा उपलब्ध करून द्यावा मनपाच्या माध्यमातून देत असलेल्या आरोग्य सुविधाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविण्यासाठी जनजागृती करावी अशा सूचना बैठकीत उपमहापौर गणेश भोसले यांनी यावेळी दिल्या.
शहरात सुरू असलेल्या साथीच्या आजारा संदर्भात उपयोजना करण्यासाठी उपमहापौर गणेश भोसले यांनी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी उपायुक्त यशवंत डांगे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे मनपा आरोग्य केंद्राचे डॉटर्स, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमहापौर गणेश भोसले बैठकीत म्हणाले की, महापालिकेमार्फत राबविण्यात येणार्या लसीकरणाची माहिती नागरिकांना होण्याकरिता व प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत देण्यात येणार्या आरोग्य सेवेबाबत जनजागृती होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बाहेर माहिती फलक लावावे व घरोघरी जाऊन नागरिकांना माहिती पत्रिकेद्वारे आरोग्य सुविधाची माहिती द्यावी. बुरडगाव रोड येथे उभारण्यात येत असलेल्या मनपाच्या हॉस्पिटल करता आवश्यक फर्निचर व अत्याधुनिक आरोग्य सुविधेच्या मशिनरी बाबतचे सविस्तर अंदाजपत्रक व प्रस्ताव तयार करण्यात यावे ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांकरता आरोग्य शिबिरे घेण्याबाबत उपायोजना करण्यात याव्यात याचबरोबर ओपन स्पेस धारकांना नोटीस बजावून स्वच्छता करून घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या. उपमहापौर गणेश भोसले यांनी सात रोगासंदर्भात आरोग्य विभागाची बैठक घेताच आरोग्य विभागाने आजपासून औषध फवारणीचे काम सुरू केले आहे. सर्वच प्रभागांमध्ये तारखेनुसार औषध फवारणी व धूर फवारणी केली जाणार आहे तरी नगरसेवकांनी व नागरिकांनी या अभियानामध्ये भाग घेऊन सर्वत्र फवारणी करून घ्यावी असे उपायुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले. मनपा आरोग्य विभागाच्या वतीने व केंद्र व राज्य शासनाच्या वतीने नागरिकांना देण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधाची माहिती दि.२५ नोव्हेंबर रोजीच्या महासभेमध्ये नगरसेवकांना देण्यात यावी. या योजना मोफत असून प्रभावीपणे राबविण्यात याव्यात व गोरगरीब रुग्णांना आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होईल यासाठी आरोग्य विभागाने सविस्तर माहिती महासभेत द्यावी अशा सूचना यावेळी उपमहापौर गणेश भोसले यांनी दिल्या.
COMMENTS