स्व.रतनशेठ मुथा व स्व.कमलाबाई मुथा यांच्या स्मरणार्थ आनंदऋषीजी हॉस्पिटलला अद्ययावत 2 डायलिसिस मशीन भेट अहमदनगर । नगर सह्याद्री राष्ट्रसंत...
स्व.रतनशेठ मुथा व स्व.कमलाबाई मुथा यांच्या स्मरणार्थ आनंदऋषीजी हॉस्पिटलला अद्ययावत 2 डायलिसिस मशीन भेट
अहमदनगर । नगर सह्याद्री
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांचा कृपाशीर्वाद असलेले आनंदऋषीजी हॉस्पिटल मानवतेचे मंदिर आहे. जैन सोशल फेडरेशनचे व्यवस्थापन आणि येथील डॉक्टर, कर्मचार्यांचा सेवाभाव रुग्णांना आपुलकीने व्याधीमुक्त करीत असतो. आजवरच्या वाटचालीत नगरच नव्हे तर राज्यातील, देशातील रूग्णांना याची प्रचिती नक्कीच आली आहे. हॉस्पिटलचे सेवा कार्य पाहूनच आई वडिलांच्या स्मृती जतन करण्यासाठी अद्ययावत 2 डायलिसिस मशीन भेट दिल्या आहेत. यातून सर्वसामान्य रुग्णांना आणखी चांगली सेवा नक्कीच मिळेल असे प्रतिपादन चंद्रकांत रतनशेठ मुथा (वांबोरीकर) यांनी केले.
मुथा परिवाराने स्व.रतनशेठ मुथा व स्व.कमलाबाई मुथा यांच्या स्मरणार्थ आनंदऋषीजी हॉस्पिटलला फ्रेसिनियस मेडिकल कंपनीचे 4008 एस एनजी या जागतिक दर्जाचे अद्ययावत 2 डायलिसिस मशीन भेट दिले. नवकारसाधक पूज्य तारकऋषीजी महाराज, पूज्य सुयोगऋषीजी महाराज, पूज्य विसोहीदर्शनाजी यांनी मांगलिक दिली. यावेळी मशीनची विधीवत पूजा करण्यात आली. याप्रसंगी मीनाताई मुनोत, अजय मुथा, ज्योत्स्ना मुथा, भाग्यश्री मुथा, आशिष मुथा, आकाश मुथा, श्रद्धा मुथा, विनोद कटारिया (वांबोरीकर), लक्ष्मीकांत झंवर, डॉ. वसंत कटारिया, उद्योजक पेमराज बोथरा, संतोष बोथरा, सतीश लोढा, निखीलेंद्र लोढा, प्रकाश छल्लानी, महेंद्र कांकरिया, डॉ. आशिष भंडारी, नेफ्रोलॉजीस्ट डॉ. गोविंद कासट यांच्यासह जैन सोशल फेडरेशनचे सदस्य, मुथा यांचा मित्रपरिवार उपस्थित होता. मीनाताई मुनोत म्हणाल्या की, आचार्यश्रींवर माझ्या आईवडिलांची नितांत श्रद्धा होती. नगरमध्ये आनंदऋषीजी हॉस्पिटल येथेच वडीलांनी डायलिसिस उपचारही घेतले होते. हॉस्पिटल हे नगरचेच नव्हे तर महाराष्ट्राचे आरोग्य वैभव आहे. येथे दिलेली मदत सत्कारणी लागते. सर्वसामान्य रूग्णांना यातून माफक दरात अथवा मोफतही आरोग्य सेवा मिळते. या सेवेत अल्प योगदान देता येणे ही भाग्याची गोष्ट आहे.
प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी सांगितले की, दानशूर व्यक्तींमुळेच मोठ्या प्रमाणात डायलिसिसचे काम सुरू आहे.या डायलेसिस विभागात आता जागतिक दर्जाच्या 34 डायलेसिसच्या मशीन आहेत.75 ते 80 रुग्णांचे डायलेसीस येथे रोज होतात.दर महिन्याला दोन हजारांहून अधिक डायलिसिस होतात. महाराष्ट्रातील अद्ययावत डायलिसिस विभाग हॉस्पिटलमध्ये आहे. हिपेटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटल मध्ये सुविधा देणारे जिल्ह्यातील एकमेव हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलचा कार्डियाक आणि नेत्र विभाग जागतिक दर्जाच्या सोयी सुविधांनी सुसज्ज व परिपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विनोद कटारिया यांनी हॉस्पिटलच्या सेवाभावाने प्रेरित होऊन हॉस्पिटलला 1 लाख 11 हजार 111 रूपयांची देणगी दिली. लक्ष्मीकांत झंवर म्हणाले की, आमचे पारिवारिक स्नेही चंद्रकांत मुथा यांनी एका मोठ्या सेवाकार्याला हातभार लावला आहे ् . आनंदऋषीजी हॉस्पिटल हे आरोग्य मंदिर असून येथे मिळणारी आरोग्य सेवा सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदान आहे.
COMMENTS