मुंबई । नगर सह्याद्री - आलिया आणि रणबीर यांना सध्या मुलगी झाली आहे. या दोघांनी आपल्या गोंडस लेकीचे स्वागत केले आहे. त्यामुळे कपूर आणि भट्ट ...
मुंबई । नगर सह्याद्री -
आलिया आणि रणबीर यांना सध्या मुलगी झाली आहे. या दोघांनी आपल्या गोंडस लेकीचे स्वागत केले आहे. त्यामुळे कपूर आणि भट्ट फॅमिलीमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. आलियाने लग्नाच्या अवघ्या 2 महिन्यांनंतरच आपल्या घरी छोटा पाहुणा येणार असल्याची घोषणा केली होती. 14 एप्रिलला आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच लग्न झाले आहे. आलियाने लग्नानंतर सात महिन्यांतच मातृत्व स्वीकारले आहे. त्यामुळे ती लग्नापुर्वीच प्रेग्नंट असल्याचे बोलले जात आहे. मात्र आलियाचे नव्हे तर ‘या’ अभिनेत्रीही लग्नापुर्वीच आई होणार होत्या.
नेहा धुपियाने मे 2018 मध्ये गुपचूप लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. जवळजवळ एक महिन्यानंतर, अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत गरोदरपणाची घोषणा केली आहे. लग्नादरम्यान अभिनेत्री तीन महिन्यांची गरोदर होती.अंगद बेदीने नेहाच्या 'नो फिल्टर नेहा' शोमध्ये ती लग्नाआधी गर्भवती झाली असल्याचा खुलासा केला होता.
सारीका सारिकाने कमल हासनशी लग्न करण्यापूर्वी दोन वर्षांपूर्वी तिची पहिली गर्भधारणा (श्रुती हासन) स्वीकारली. आत्तापर्यंत, अभिनेत्री त्या काही अभिनेत्रींमध्ये समाविष्ट आहे ज्यांनी त्यावेळच्या स्टिरियोटाइप्सचा भंग केला आहे.
अभिनेत्री नीना: आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री नीना या देखील लग्नाआधीच गरोदर झाल्या होत्या. नीना गुप्ता यांचा विवाह वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांच्या सोबत विवाह केला आहे.
अभिनेत्री-मॉडेल नतासा स्टॅनकोविक हिने भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याशी 20 मे 2020 मध्ये लग्नगाठ बांधली होती. ती ही लग्नापूर्वीच गर्भवती झाली होती.
COMMENTS