अल्पवयीन मुलालाही घेतले ताब्यात ः अटक आरोपींची संख्या तीन अहमदनगर । नगर सह्याद्री येथील एका संस्थेतून निघून गेलेल्या तरूणीवर शिर्डी येथे ...
अल्पवयीन मुलालाही घेतले ताब्यात ः अटक आरोपींची संख्या तीन
अहमदनगर । नगर सह्याद्री
येथील एका संस्थेतून निघून गेलेल्या तरूणीवर शिर्डी येथे हॉटेलवर कामाला असलेल्या तरूणांनी केलेल्या अत्याचार प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आल्याने अटक आरोपींची संख्या तीन झाली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
उमेश भागचंद राठोड (वय 19), जितेंद्र रमेश चव्हाण (वय 21), लखन अरूण गोसावी (वय 23) व एक अल्पवयीन (सर्व रा. कुंभारी खुर्द ता. जामनेर, जि. जळगाव) अशी आरोपींची नावे आहेत. नगर शहरातील एका संस्थेत राहत असलेली तरूणी 14 जुलैला निघून गेली. ती शिर्डी मंदिर परिसरात एकटीच राहत होती. शिर्डी येथे हॉटेलमध्ये काम करणार्या तरूणांनी त्या तरूणीवर अत्याचार केला होता. पीडिताने दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्ष्यात घेता पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी शिर्डी येथील घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला. सुरूवातीला दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून आणखी दोघांची नावे समोर आले. तिघांना अटक केली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.ही कारवाई अधीक्षक ओला, अप्पर अधीक्षक खैरे, उपअधीक्षक पाटील, शिर्डीचे उपअधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गुलाबराव पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आठरे, सहाय्यक निरीक्षक संभाजी पाटील, महिला सहाय्यक निरीक्षक पल्लवी उबरहंडे, उपनिरीक्षक दीपक पाठक, उपनिरीक्षक योगेश चाहेर, उपनिरीक्षक माळी, पोलीस अंमलदार विजय नवले, मच्छिंद्र पांढरकर, संदीप चव्हाण, किशोर जाधव, जयसिंग शिंदे, संदीप गडाख, नितीन शेलार, अजय अंधारे, राणी वरघुडे, मैना माळी, सुलभा औटी यांच्या पथकाने केली.
COMMENTS