अहमदनगर / नगर सह्याद्री खोसपुरी शिवारातील पांढरीपूल येथे रविंद्र हायवे सर्व्हिसचे पेट्रोल पंपावर दि.१३ / ११ / २०१० . ...
अहमदनगर / नगर सह्याद्री
खोसपुरी शिवारातील पांढरीपूल येथे रविंद्र हायवे सर्व्हिसचे पेट्रोल पंपावर दि.१३ / ११ / २०१० . रोजी संध्याकाळी ७.३० वा. चे सुमारास रविराज तुकाराम गडाख रा.पानसवाडी हा टँकरमधील १२,०००/- लिटर निळे रंगाचे रॉकेल नेवून त्यातील ४,००० लिटर रॉकेल खाली करतांना मिळून आला म्हणून त्याचे विरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असता त्याची चौकशी येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांचे समोर होवून त्यात गुन्हा सिद्ध न झाल्याने वरील आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
रविराज हे शेवगांव-नेवासाचे माजी आमदार व अहमदनगरचे माजी खासदार तुकाराम गडाख यांचे पूत्र आहेत. रविराज गडाख यांच्यातर्फे अॅड.सतिशचंद्र सुद्रिक यांनी काम पाहिले.
COMMENTS