नेवासा । नगर सह्याद्री जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यात हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय करणार्या दोन हॉटेलवर छापा टाकून मोठी कारवाई करण्यात आली ...
नेवासा । नगर सह्याद्री
जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यात हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय करणार्या दोन हॉटेलवर छापा टाकून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
नेवासा फाटा परिसरात सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून नेवासा फाटा परिसरात असलेल्या हॉटेल औदुंबर व हॉटेल नमगंगा या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी खात्री केली. त्यानंतर मोठ्या फौज फाट्यासह एकाच वेळी दोन्ही हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत पाच पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली. या प्रकरणी विक्रम बाळासाहेब साठे आणि अमोल नामदेव पैठणे यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन येथे महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे नेवासा फाटा परिसरात व शहरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
COMMENTS