अहमदनगर / नगर सह्याद्री अभिनय सम्राट दिलीपकुमार ची सर्वोत्तम अदाकारी, सलिलचौधरी सुरीली जादूगरीने लोकसंगीताच्या ठेकया...
अहमदनगर / नगर सह्याद्री
अभिनय सम्राट दिलीपकुमार ची सर्वोत्तम अदाकारी, सलिलचौधरी सुरीली जादूगरीने लोकसंगीताच्या ठेकयावर पार्श्वगायिका लता मंगेशकरचा अविट स्वरावर वैजयंती मालाचे मनमोहक नृत्य ,एकापेक्षा एक अविस्मरणीय गाणी, उग्रनारायण भूमिकेत प्राण खलनायकी, जॉनी वॉकर ची कॉमेडी आणि बिमलरॉयचे अप्रितम दिग्दर्शन असा सर्वांग सुंदर चित्रपटाला रहमत सुलेमान हॉल मध्ये रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून प्रत्येक प्रसंगाला मनापासून प्रतिसाद देत तरूणाइतील आठवणीत रममाण झाले.
चित्रपटाचा शुभारंभ जेष्ठ चित्रकार,कार्टूनिस्ट वसंतराव विटणकर यांच्या हस्ते झाले. पत्रकार अबिद दुलेखान यानी कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना " प्रत्येक शुकवारी 1950 ते 1970 सुवर्ण काळातील लोकप्रिय हिंदी मराठी लोकप्रिय चित्रपट विनामूल्य दाखविले जाणार अश्या अनोख्या उपक्रमाबद्दल "आनंद क्रिएशन"चे नंदकिशोर आढाव व दिलीप अकोलकरांचे तसेच प्रायोजक आर जे असोसिएट चे रौनक जानवे यांचे आभार व्यक्त केले.
वसंतराव विटणकरांची ओळख नुसती चित्रकार व कार्टूनिस्ट असूनही त्याहुन महत्वाचे मुंबईला शिकत असताना" बरसात ते राम तेरी गंगा मैली",राजकपूर च्या प्रत्येक चित्रपटाचे कला दिग्दर्शक एम आर आचरेकर सराकडे क्लासला जात असताना उषा व मीना मंगेशकर भगिनीसहकारी असत. आर के स्टूडियो, फेमस ,रणजीत, रूपतारा व मोहन स्टूडियोत बंधु चंद्रकांत सोबत नागिन, गूंज उठी शहनाई ,"नास्तिक,जिस देशमें गंगा बहती हैं इत्यादि अनेक सिनेमाचे पोस्टर्स तयार केले आहेत, जॉय मुखर्जी, चंद्रकांत, सूर्यकांत व सुधीर फड़के कलवंताशी मैंत्रिचे नाते होते अशा अनेक अन्यात पैलूचा प्रवास नंदकिशोर आढाव यानी उलगडून सांगितला.रसिक प्रेक्षकाना अहमदनगर शहरात आजपर्यंत चित्रपटा संबधात अनेक कार्यक्रम केले आहेत आणि या पुढे चित्रपटा शिवाय नावीन्यपूर्ण मनोरंजक उपक्रम देण्याचा पर्यत्न करू असे सागंत प्रेक्षकाचे आभार मानले.
युनुस तांबटकर, जयंत येलुलकर, रविन्द्र सातपुते, अरविंद ब्राम्हणे, अशोक गिरी,शरद मंडूर, रौनक जानवे,राजाभाऊ पोतदार,श्री कोरे, शैलेन्द्र गांधी आणि वैद्य, काळे मैडम जुन्या सिनेमा व संगीत प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.शेवटी दिलीप अकोलकर यांनी सर्व उपस्थित रसिकांचे आभार मानले.
COMMENTS