पुणे । नगर सह्याद्री - महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशन (मुंबई) या संस्थेच्या उपाध्यक्षपदी पुण्याचे निवृत्त विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यां...
पुणे । नगर सह्याद्री -
महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशन (मुंबई) या संस्थेच्या उपाध्यक्षपदी पुण्याचे निवृत्त विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल चंद्रकात दळवी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्रामध्ये लॉन टेनिस या खेळाच्या राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्पर्धा या संस्थेमार्फत भरविल्या जातात. लॉन टेनिस खेळाचा महाराष्ट्र राज्यभर प्रचार प्रसार व्हावा म्हणून ही संस्था विविध उपक्रम राबविते. चंद्रकांत दळवी हे नामांकित खेळाडू असून कॉलेज जीवनात ते व्हॉलीबॉल संघाचे विद्यापीठाचे कर्णधार होते. ते उत्तम बॅडमिंटन आणि लॉन टेनिस खेळाडू आहे. डेक्कन जिमखाना पुणे येथे ते नियमितपणे लॉन टेनिस खेळातात. महाराष्ट्र डायरेक्ट व्हॉलीबॉल क्रिडा संघटनेचे ते सल्लागारही आहेत.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन ही महाराष्ट्रातील टेनिस खेळाची एकमेव नियंत्रक आणि प्रशासकीय संस्था आहे. ही सोसायटी नोंदणी कायदा 1860 अंतर्गत नोंदणीकृत आहे. तिचे सदस्य, मतदान हक्क, विविध क्लब आणि जिल्हा टेनिस संघटना आहेत. यात मतदानाचा हक्क नसलेले सदस्य, कॉर्पोरेट संस्था, शैक्षणिक संस्था, विद्यापीठ किंवा सरकार किंवा निमशासकीय मान्यताप्राप्त संस्था यांची कोणतीही सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेच्या उपाध्यक्षपदी चंद्रकांत दळवी यांची निवड झाली आहे.
चंद्रकात दळवी यांची भारतीय प्रशासकीय सेवेत असताना उत्तम प्रशासक अशी ओळख राहिलेली आहे. त्यांच्या कामाच्या शिस्तीमुळे त्यांना मॅनेजमेंट गुरू देखील म्हटले जाते. प्रशासकीय सेवेत असताना त्यांनी राबवलेले झीरो पेंडन्सी धोरण त्यांच्या उत्तम प्रशासकीय धोरणांपैकी एक, त्याच बरोबर ग्राम स्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव अभियानात देखील त्यांनी केलेले काम महत्त्वपूर्ण ठरले आहे. ग्रामीण भागासोबत त्यांची नाळ कायम जोडलेली आहे. त्यांच्या निढळ गावात त्यांनी विविध उपक्रम राबविले. ग्रामस्वच्छता अभियानात देखील निढळ गावाला पारितोषिक मिळाले होते. त्यांनी गावात राबविलेल्या पाणलोट आणि जलसंधारणांच्या कामांमुळे गावाचा कायापालट झाला. कायम दुष्काळी असलेले गाव सुजलाम सुफलाम झाले.
COMMENTS