केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती मुंबई | वृत्तसंस्था - सर्व सरकारी वाहनं १५ वर्षानंतर स्कॅप करणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
मुंबई | वृत्तसंस्था -
सर्व सरकारी वाहनं १५ वर्षानंतर स्कॅप करणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मान्यतेनंतर ही योजना अंमलात आणण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. १५ वर्षानंतर वाहनं ही जुनी होतात, त्यातून प्रदूषण वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
पर्यावरणपूरक आणि धाडसी निर्णयामुळे नितीन गडकरी यांची वेगळीच ओळख आहे. आता गडकरी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. या निर्णयाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सहमती दर्शवल्याचं गडकरी यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २६ जुलै २०१९ रोजी मोटार वाहन कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला होता. त्यामध्ये सरकारी विभागाच्या १५ वर्षाहून जुन्या वाहनांना भंगारात काढावे अशी तरतूद करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता देशात स्क्रॅपिंग पॉलिसी अंमलात येणार आहे. सरकारी विभागाच्या १५ वर्षापेक्षा जुन्या गाड्यांचे १ एप्रिल २०२२ पासून रजिस्ट्रेशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मान्यतेनंतर ही योजना अंमलात येणार असल्याचे मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
प्रत्येक जिल्ह्यात रोजगारनिर्मित होणार
सरकारी गाड्या स्क्रॅप करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये युनिट उभा करणार असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले. त्यामुळे त्या-त्या जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे. या निर्णयामुळे वाढलेल्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येईल. सध्या तरी केवळ सरकारी वाहनांच्या बाबतीत हा निर्णय होण्याची शयता आहे.
COMMENTS