अहमदनगर । नगर सह्याद्री घरासमोर रस्त्याच्या बाजुला उभ्या केलेल्या दोन दुचाकी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्या. रविवारी रात्री पावणे बाराच्य...
अहमदनगर । नगर सह्याद्री
घरासमोर रस्त्याच्या बाजुला उभ्या केलेल्या दोन दुचाकी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्या. रविवारी रात्री पावणे बाराच्या दरम्यान शनी मंदिरा शेजारी, टांगे गल्लीत ही घटना घडली.
या प्रकरणी सुनील अशोक एडके (वय 34) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांनी रविवारी रात्री त्यांची दुचाकी (एमएच 16 सीडब्ल्यू 6013) व शेजारी त्यांची बहिण अनिता भाऊसाहेब तेलोरे यांची दुचाकी (एमएच 45 एजे 675) उभी केली होती. रात्री पावणे बाराच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने या दोन्ही दुचाकींवर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
COMMENTS