निघोज / नगर सह्यादी कवी महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन मुलिका देवी महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले. याव...
निघोज / नगर सह्यादी
कवी महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन मुलिका देवी महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले. यावेळी बदलापूर येथील ज्येष्ठ कवी नाना ढवळे यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सहदेव आहेर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी युवा कवी संदीप राठोड व उपप्राचार्य मनोहर एरंडे आदी उपस्थित होते.
शब्दांचा आविष्कार मांडीत समाजजिवणाचे मन कवीमनातून सादर करण्याचे काम करणारे कवी ग्रामिण विकासाचे पाईक असल्याचे प्रतिपादन मुलिका देवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सहदेव आहेर यांनी व्यक्त केले आहे.
पारनेर तालुक्यातील निघोज येथील श्री मलिकादेवी महाविद्यालय येथे मराठी विभागाच्या वतीने कवी आपल्या भेटीला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवा कवी संदीप राठोड आणि ज्येष्ठ कवी नाना ढवळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर उपस्थित होते.
कवी नाना ढवळे यांनी बालमनाच्या कविता सादर करून मुलांना त्यांच्या बालपणाची आठवण करून दिली तसं बालकविता लिहिणे म्हणजे लहान होऊन जाणे असे मत त्यांनी व्यक्त केले.युवा कवी संदीप राठोड यांनी आपल्या कवितेमधून ऊस तोडणी मजुराच्या, कष्टकरी शेतकरी बापाच्या, भुकेच्या जाणिवेच्या कविता सादर करून श्रोत्यांची दाद मिळविली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर म्हणाले की जो न देखे रवी ओ सबकुछ देखे कवी या वचनांना उदृत करत कवींचे महात्म्य त्यांनी व्यक्त केले कविता या समाज मनाचा आरसा असतात तसेच कवी वास्तविक जीवनाचा परिपाठ आपल्या शब्दातून कवितेच्या माध्यमातून व्यक्त करतात असे मत त्यांनी मांडले.
कवी हे ग्रामीण भागाच्या विकासाचे पाईक असून संदीप राठोड यांनी कमी वयात समाजजिवणावरील कवीता तयार करून उसतोडणी मजूर, शेतकरी, सर्वसामान्य माणूस यांना कवी मनातून मोठे स्थान देऊन त्यांच्या वेदना समाजापुढे आणीत सामान्य जनतेला आधार देण्याचे काम खऱ्या अर्थाने केले असल्याचे प्रतिपादन डॉ आहेर यांनी व्यक्त केले आहे. यावेळी उपप्राचार्य मनोहर एरंडे तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख व प्राध्यापक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. प्रवीण जाधव यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. विशाल रोकडे यांनी केले आभार डॉ. गोविंद देशमुख यांनी मांडले.
COMMENTS