केडगाव ग्रामस्थ केडगाव शिवसेनेचा इशारा अहमदनगर / नगर सह्याद्री केडगाव ते नेप्ती रोडचे काम तातडीने चालू करण्यात यावे अन्यथा केडगांव शिवसेन...
केडगाव ग्रामस्थ केडगाव शिवसेनेचा इशारा
अहमदनगर / नगर सह्याद्री
केडगाव ते नेप्ती रोडचे काम तातडीने चालू करण्यात यावे अन्यथा केडगांव शिवसेनेच्यावतीने दि. १ डिसेंबर रोजी २०२२ रोजी नगर-पुणे रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा निवेदनाद्वारे केडगांव शिवसेना विभागप्रमुख संग्राम कोतकर यांनी कोतवाली पोलिस स्टेशनला दिलेल्या निवेदनात दिला आहे. या प्रसंगी नगरसेवक अमोल येवले, विजय पठारे, बबलू शिंदे, नगरसेविका सुनिता कोतकर आदि उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, केडगांव-नेप्ती रोड भागात अनेक उपनगरे आहेत. तेथील नागरिकांना येण्या-जाण्याचा नेप्ती रोड हा एकमेव मार्ग आहे. या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. व अनेकांना मणक्यांचे आजार जडले आहेत . या रस्त्यांबाबत दि.३१ ऑक्टोंबर २०२२ रोजी सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता यांना पत्र दिले होते. त्यांनी १०दिवसात काम करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु २१ दिवस उलटून गेले तरी अद्याप काम चालू झाले नाही, त्यामुळे केडगांव भागातील नगरसेवक व शिवसेनेच्यावतीने प्रभागातील नागरिकांनासह दि. १ डिसेंबर २०२२ रोजी नगर-पुणे रोडवरील हॉटेल अर्चना समोर रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.या रास्तारोको मध्ये केडगाव ग्रामस्थ ,सर्व नागरिक ,शिवसेना नगरसेवक ,शिवसेना सर्व पदधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.
COMMENTS