जुगार अड्डयावर छापा; २८ प्रतिष्ठित जुगारी पकडले

कोपरगाव | नगर सह्याद्री -  तालुक्यातील टाकळी फाट्याजवळ असलेल्या धोंडीबानगर येथील घराच्या टेरेसवरील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकत चारचाकी, द...





कोपरगाव | नगर सह्याद्री - 

तालुक्यातील टाकळी फाट्याजवळ असलेल्या धोंडीबानगर येथील घराच्या टेरेसवरील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकत चारचाकी, दुचाकी वाहने, मोबाईल व दोन लाखांच्या रोख रकमेसह साडेतेवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार खेळणार्‍या २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून बुधवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

सविस्तर असे की, एसपी राकेश ओला स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. त्यानुसार पोनि अनिल कटके यांनी जिल्ह्यातील जुगार व मटका अशा अवैध धंद्याविरुध्द कारवाई करणे करीता स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि दिनकर मुंडे, पोसई सोपान गोरे, सफौ मनोजर शेजवळ,  विष्णु घोडेचोर, पोहेकॉ बापुसाहेब फोलाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना शंकर चौधरी, भिमराज खर्से, लक्ष्मण खोकले, पोकॉ रणजीत जाधव, योगेश सातपुते, चापोहेकॉ उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर यांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.

स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार कोपरगांव, शिर्डी व राहाता परिसरात फिरुन अवैध धंद्यांची माहिती घेत असतांना पोनि अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, टाकळी फाटा येथील धोंडीबानगर, ता. कोपरगांव येथे योगेश बन्सी मोरे याचे इमारतीचे टेरेसवर काही इसम पैशावर खेळला जाणारा तिरट नावाचा तीन पत्त्यांचा जुगार खेळत आहेत. या माहितीनुसार पथकास कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.

पथकाने काही अंतरावर वाहने उभी करुन इमारतीचे जिन्यातुन टेरेसवर जावून जुगार अड्ड्यावर छापा टाकला. दरम्यान २८ आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचे अंगझडती मध्ये २ लाख पाच हजार ६७० रुपये विविध कंपनीचे ३० मोबाईल फोन, ४ चारचाकी व ७ दुचाकी वाहने असा एकुण २३ लाख ३५ हजार ३७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरुध्द कोपरगांव शहर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे शंकर संपत चौधरी ने. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

बागडपट्टीतही जुगार अड्पोलिसांचा छापा

बागडपट्टी येथे तिरट जुगार खेळणार्‍या पाच जणांना तोफखाना पोलिसांनी छापा टाकून पकडले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, चारचाकी, दुचाकी असा पाच लाख ८५ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अंमलदार सचिन बाचकर यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रिंटु कुमार नंदलाल कुमार महातूर (वय ४२), अमितकुमार अनिलसिंग कुमार (वय ३१), पवन मदन राऊत (वय ४९), अरविंद लखन राऊत (वय ४३), राहुलसिंग गौरीशंकर सिंग (वय २६, सर्व मुळ रा. बिहार, हल्ली रा. बागडपट्टी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बागडपट्टी परिसरात एका बंद घराच्या आडोशाला तिरट जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना मिळाली होती.



COMMENTS

Name

Accident,38,Ahmednagar,7291,Akole,20,braking,47,Breaking,5148,Business,7,corona,567,Crime,1457,e,2,economics,11,Editorial,29,education,146,Entertainment,1354,Epaper,29,Health,403,indan,8,India,1240,Jamkhed,46,Karjat,9,Kopargaon,6,loni,28,m,1,ma,1,Maharashtra,4938,manoranjan,14,Mumbai,231,Nagar,291,Newasa,65,Parner,3048,Parner Ahmednagar,57,Parner-news-sujit-zaware-sosiety-ele-1037893,2,Pathardi,19,Politics,1296,Rahata,45,Rahuri,19,SadPadsad,19,sampadkiy,99,Sangamner,157,Saripath,44,Shevgaon,11,shivvyakhyate-tapkir-news,1,Shrigonda,137,Shrirampur,9,Sport,272,sports,43,weather,32,World,132,
ltr
item
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री: जुगार अड्डयावर छापा; २८ प्रतिष्ठित जुगारी पकडले
जुगार अड्डयावर छापा; २८ प्रतिष्ठित जुगारी पकडले
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhoL1DxPc__TgMU0gah698CCzY6R2DNyJhoGSt_jdCTccfPIa2QBGw8TVUiPM6NMT0slQz22ORjm9o6XajQzzxMM7G1w3H63OfboebXGriemL2k1GXZLwrqGSBiwr2Sh7n4eNrLArGYZoXwyvWOyj0oG65Lpe8kHiRXq7zYZhW-RUzpTdmNP6WeU-Sc/w640-h479/JUGAR.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhoL1DxPc__TgMU0gah698CCzY6R2DNyJhoGSt_jdCTccfPIa2QBGw8TVUiPM6NMT0slQz22ORjm9o6XajQzzxMM7G1w3H63OfboebXGriemL2k1GXZLwrqGSBiwr2Sh7n4eNrLArGYZoXwyvWOyj0oG65Lpe8kHiRXq7zYZhW-RUzpTdmNP6WeU-Sc/s72-w640-c-h479/JUGAR.jpg
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री
https://www.nagarsahyadri.com/2022/11/JUGAR-AADDA-CHAPA-AHMEDNAGAR-POLICE-KARVAI.html
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/2022/11/JUGAR-AADDA-CHAPA-AHMEDNAGAR-POLICE-KARVAI.html
true
3854568444215913215
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content