अहमदनगर / नगर सह्याद्री जिल्हा क्रीडा कार्यालय व अहमदनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय बास्क...
अहमदनगर / नगर सह्याद्री
जिल्हा क्रीडा कार्यालय व अहमदनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय बास्केटबॉल व बॅडमिंटन स्पर्धेत आयकॉन पब्लिक स्कूलने प्रथम क्रमांक मिळविला आहे. जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात आयकॉन पब्लिक स्कूलच्या मुलींच्या बास्केटबॉल संघाने प्रथम क्रमांक पटकावला. बॅडमिंटन स्पर्धेत आयकॉन पब्लिक स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला.
मुलींच्या बास्केटबॉल संघात आरना रहेजा, आद्या रहेजा, गिरिष्मा शेटिया, आसावरी काळे, आदिती श्रीवास्तव, मनुश्री कुमार, पल्लवी जोशी, युक्ती देसर्डा, निशिता मुथा, रिदिमा फिरोदिया, स्नेहा लोंढे, पलक गांधी यांचा समावेश होता. मुलांच्या बॅडमिंटन संघात शौर्य पुरोहित, ईशान झंवर, अनय देशमुख, राजवर्धन वीर, हर्ष ढेमरे यांचा समावेश होता.
विजेतेपद मिळविलेल्या खेळाडूंना क्रीडा शिक्षक साईनाथ कोल्हे, सचिन भापकर, सुजाता सब्बन यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे डायरेक्टर कर्नल आर.सी. राणा, आराधना राणा, मुख्याध्यापिका दीपिका नगरवाला यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
COMMENTS