बिहारमधील पंचांचा निर्णय / व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कारवाई नवी दिल्ली | वृत्तसंस्था एका ५ वर्षीय मुलीवर बलात्कार करणार्या आरोपीला अवघ्या ५ ...
बिहारमधील पंचांचा निर्णय / व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कारवाई
नवी दिल्ली | वृत्तसंस्था
एका ५ वर्षीय मुलीवर बलात्कार करणार्या आरोपीला अवघ्या ५ उठाबशांची शिक्षा देण्यात आल्याची संतापजनक घटना बिहारच्या नवादात घडली आहे. या शिक्षेनंतर प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला; पण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई करण्यात आली.
नवादा जिल्ह्यातील अकबरपूर तालुयातील कनौज गावात ही घटना घडली. त्यात एका ५ वर्षीय मुलीवर बलात्कार करणार्या नराधमाला कथित पंचांनी अवघ्या काही उठाबशांची शिक्षा देऊन निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र बहाल केले. अरुण पंडित असे आरोपीचे नाव आहे. त्याचा गावात कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे. आरोपीने या कुक्कुटपालनाच्या शेडमध्येच मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ज्या प्रकारे प्रकरण दाबून टाकण्यात आले त्याचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे.
पंचायतीच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये एक शाल घेतलेला व्यक्ती उठाबशा काढताना दिसून येत आहे. त्याच्या बाजूला नागरिक बसलेले दिसतात. पाच उठाबशांची शिक्षा दिल्यानंतर त्याला सोडले. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर त्यावर चौफेर टीका सुरू झाली आहे. भारतात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्यांवर पॉसो कायद्यांतर्गत खटला चालवला जातो. त्यात जन्मठेपेची तरतूद आहे. येथे केवळ ५ उठाबशा काढून प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला.
COMMENTS