पीएचडी करणार्याने औरंगाबादमध्ये मैत्रीणीसह स्वतःला घेतले जाळून औरंगाबाद । नगर सह्याद्री जिंतूर तालुक्यातील दाभादिग्रस गावातून आलेला गजान...
पीएचडी करणार्याने औरंगाबादमध्ये मैत्रीणीसह स्वतःला घेतले जाळून
औरंगाबाद । नगर सह्याद्री
जिंतूर तालुक्यातील दाभादिग्रस गावातून आलेला गजानन खुशाल मुंडे (30) हा पीएचडी करणार्याने प्रेमाच्या आहारी गेल्याने टोकाचे पाऊल उचलत स्वत:सह संशोधक मैत्रीण पूजा साळवे (28, रा. दहेगाव, ता. सिल्लोड) हिला पेटवून आयुष्याची राखरांगोळी केली.
गुन्ह्याचा तपास करण्याचे प्रशिक्षण देणार्या शासकीय विज्ञान संशोधन महाविद्यालयात ही घटना घडली. प्रयोगशाळेचे दार बंद करून गजाननने पेटवून घेतल्याने दार तोडून त्याला वाचवण्याचे प्रयत्न करावे लागले. सोमवारी दुपारी गजाननने पूजाच्या कॉलेजमध्ये जाऊन प्राध्यापिकेसमक्ष स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतले व पूजालाही कवेत घेतले. यात गजानन 95 टक्के, तर पूजा 40 टक्के भाजली. रात्री उशिरा गजाननचा मृत्यू झाला, पूजावर उपचार सुरू आहेत.
पूजाने माझ्याशी लग्न केले, नंतर विश्वासघात केला. मी तिच्यावर आतापर्यंत दोन ते अडीच लाख रुपये खर्च केले. असे असतानाही ती माझ्यासोबत राहत नाही. माझ्या खर्या प्रेमाला ती ओळखू शकली नसल्याने आता आपणही जगायचे नाही अन तिलाही जिवंत ठेवणार नाही, असा निर्णय घेऊन हे पाऊल उचलले, असा जबाब गजाननने पोलिसांना दिला. पूजाने पोलिसांना सांगितले, की माझी इच्छा नसताना गजानन पाठलाग करायचा. मी वारंवार त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने एकले नाही. त्यामुळे मी पोलिस ठाण्यात गेले. दरम्यान, पूजाच्या नातेवाइकांनी रात्री उशिरा बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावर कारवाई सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. कलम 307 नुसार यात गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
COMMENTS