अहमदनगर । नगर सह्याद्री - चार ते पाच जणांनी तरूणाला मारहाण करत वाहनातून अपहरण केल्याची घटना सोमवारी रात्री सहकार सभागृहाजवळ घडली. सचिन अजि...
अहमदनगर । नगर सह्याद्री -
चार ते पाच जणांनी तरूणाला मारहाण करत वाहनातून अपहरण केल्याची घटना सोमवारी रात्री सहकार सभागृहाजवळ घडली.
सचिन अजिनाथ सानप (वय 20 रा. त्रिमुर्ती चौक, सारसनगर) असे अपहरण झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन सानप यांची पत्नी शितल यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास सचिन सानप सहकार सभागृहाकडून सारसनगरकडे येत असताना एका पानटपरीसमोर त्यांना चार ते पाच जणांनी अडविले. त्यांना मारहाण करीत कारमध्ये जबरदस्तीने बसवून पुणे रोडने घेऊन गेले. याची माहिती पत्नी शितल यांना मिळाल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिसांशी संपर्क साधून फिर्याद दिली आहे.
COMMENTS