दुचाकीस्वार जखमी । चारही वाहनांचे नुकसान अहमदनगर । नगर सह्याद्री पुण्याहून औरंगाबादकडे जाताना उड्डाणपुलावर स्पीड ब्रेकरजवळ चार वाहनांचा वि...
दुचाकीस्वार जखमी । चारही वाहनांचे नुकसान
अहमदनगर । नगर सह्याद्री
पुण्याहून औरंगाबादकडे जाताना उड्डाणपुलावर स्पीड ब्रेकरजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात चारही वाहनांचे नुकसान झाले आहे.
नगर शहरातील उड्डाणपूल 19 नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तसेच अपघात टाळण्यासाठी उड्डाणपुलावर पादचारी व फेरीवाल्यांना बंदी घालण्यात आली असल्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले आहेत. उड्डाणपुलाचे उद्घाटन झाल्यानंतर दोनच दिवसात अपघात झाला होता.
त्यानंतर शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास पुण्याहून औरंगाबादकडे जाताना उड्डाणपुलावर स्पीडब्रेकर जवळ ट्रक क्रमांक एमएच 18 बीई 5747, इनोव्हा एमएच 14 ईपी 5631, एमएच 43 बीयु 8193 मारुती वेगन व मोटार सायकल अशा चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलस्वार जखमी झाला असून त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर काही काळ उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थही तात्काळ धाव घेत अपघाती वाहने बाजूला घेत वाहतूक सुरळीत करुन दिली.
COMMENTS