अहमदनगर । नगर सह्याद्री उड्डालपुलावर ट्रक उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दा...
अहमदनगर । नगर सह्याद्री
उड्डालपुलावर ट्रक उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजित दिलीप मोरे (वय 25 रा. लिंबा गणेश, ता. जि. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. पोलीस अंमलदार श्रीकांत खताडे यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. नागरिकांकडून उड्डाणपुलावर गर्दी केली जात आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, असे वाहने उभे करून फोटो काढले जात आहेत. सोमवारी सकाळी ट्रक चालक मोरे याने उड्डाणपुलावरील रस्त्यावर ट्रक मध्यभागी उभा करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला होता. पोलिसांनी ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS