अहमदनगर । नगर सह्याद्री कारमधून वाहतूक केली जाणारी सुगंधी तंबाखू कोतवाली पोलिसांनी पकडली. कार, सुगंधी तंबाखू, रोख रक्कम असा 10 लाख 62 हजार ...
अहमदनगर । नगर सह्याद्री
कारमधून वाहतूक केली जाणारी सुगंधी तंबाखू कोतवाली पोलिसांनी पकडली. कार, सुगंधी तंबाखू, रोख रक्कम असा 10 लाख 62 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुरूवारी पहाटे बीएसएनएल गल्लीत पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पोलीस अंमलदार अभय कदम यांच्या फिर्यादीवरून सुगंधी तंबाखूची वाहतूक करणार्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तौसिफ अहेमद सिद्दीकी (वय 36 रा. हत्तेसिंगपुरा, औरंगाबाद) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. अशोका हॉटेलच्या समोरील रोडवर बीएसएनएल गल्लीत एक इसम ईनोव्हा चारचाकी (एमएच 20 बीटी 7633) लावून सुगंधी तंबाखूची चोरून विक्री करत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार कदम, दीपक बोरूडे, सलीम शेख, विष्णू भागवत, सुमित गवळी, अतुल काजळे, दीपक कैतके, अनुप झाडबुके यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. पथकाने गुरूवारी पहाटे तीनच्या दरम्यान छापा टाकला असता त्यांना चारचाकी वाहनामध्ये 51 हजार रूपये किंमतीची सुगंधी तंबाखू मिळून आली. सर्व मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेत सिद्दीकीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.
COMMENTS