अहमदनगर । नगर सह्याद्री रस्त्यावर स्टेज टाकून वाढदिवस साजरा करणे चांगलेच भोवले. वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याने वाढदिवस असलेल्या तरूणासह...
अहमदनगर । नगर सह्याद्री
रस्त्यावर स्टेज टाकून वाढदिवस साजरा करणे चांगलेच भोवले. वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याने वाढदिवस असलेल्या तरूणासह तिघांविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपनीय शाखेचे पोलीस अंमलदार तनवीर शेख यांनी फिर्याद दिली आहे.
सागर मुर्तुडकर, सचिन पराजी दिवटे, राकेश राजू जाधव (सर्व रा. वंजार गल्ली, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बुधवारी 16 नोव्हेंबरला सागर मुर्तुडकर याचा वाढदिवस होता. वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमासाठी सागर मुर्तुडकर, सचिन पाराजी दिवटे, राकेश राजू जाधव यांनी कोंड्यामामा चौकात स्टेज टाकून सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण केला. तसेच तोफखाना पोलिसांनी दिलेल्या लेखी सूचनांचे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
COMMENTS