कंत्राट मिळवून देण्याच्या आमिषाने 31 लाखांना गंडा

  अहमदनगर । नगर सह्याद्री  शासकीय रूग्णालयाला औषधे आणि वैद्यकिय उपकरणांचा पुरवठा करण्याचे काम मिळविण्याचे अमिष दाखवून औषध एजन्सी चालकाला 31 ...

 


अहमदनगर । नगर सह्याद्री 

शासकीय रूग्णालयाला औषधे आणि वैद्यकिय उपकरणांचा पुरवठा करण्याचे काम मिळविण्याचे अमिष दाखवून औषध एजन्सी चालकाला 31 लाखांना फसविले. या प्रकरणी विजय साहेबराव ढेरे (रा. लोहगाव, ता. नेवासा), सचिन भाऊसाहेब गुलदगड (रा. गुलदगडमळा, राहुरी), पुष्पक एल. महालकर (रा. धावडे, पुणे), कांचन बराई (रा. धावडे, पुणे) या चौघांविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुरूवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश राजमल फिरोदिया (वय 31 रा. शिवगंगा टॉवर्स, सारसनगर, नगर, मूळ रा. दौलावडगाव, ता. आष्टी, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे शहरातील जुना बाजार भागात सिटीप्राईड गेस्ट हाऊसमध्ये श्री गणेश एजन्सी नावाचे औषधे विक्रीचे दुकान आहे. प्रकाश दरेकर (रा. निंबळक, ता. नगर) यांचे युवराज फार्मा हे दुकान आहे. व्यवसायाच्या अनुषंगाने फिर्यादी यांची त्याच्याशी ओळख झाली होती. दरेकर याने 31 ऑगस्ट 2019 रोजी  फोन करून, औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात औषधे आणि वैद्यकीय उपकरणाची मोठी ऑर्डर आहे. डीकेटी फार्माचे रिझनल मॅनेजर विजय साहेबराव ढेरे व अतुल गवळी ही ऑर्डर आपल्याला मिळवून देणार असल्याचे सांगितले. त्या अनुषंगाने ढेरे यांच्यासमवेत व्यवहाराच्या अनुषंगाने नगरला एका हॉटेलमध्ये बैठक झाली. बैठकीत ठरल्याप्रमाणे डीकेटी कंपनीचा माल पुणे येथील युनिव्हर्सल अ‍ॅण्ड तपाडिया एजन्सीमधून 13 सप्टेंबर ते 16 ऑक्टोंबर 2019 या कालावधीत वेळोवेळी 31 लाख 57 हजार 689 रूपयांची औषधे आणि वैद्यकीय उपकरणे खरेदी केले. ढेरे यांनी घाटी रूग्णालयासाठी माल खरेदी केला नाही. घाटी रूग्णालयात जाऊन प्रत्यक्ष खात्री केली असता, अशा स्वरूपाची औषधे आणि उपकरणांची आवश्यकता नसल्याचे समजले.ढेरे याने हा माल खरेदी करण्यासाठी दुसरी पार्टी तयार असल्याचे सांगून सचिन भाऊसाहेब गुलदगड (रा. सुलक्ष्मी निवास, तनपुरेवाडी रस्ता, राहुरी), पुष्पक एल. महालकर (रा. धावडे, पुणे), कांचन बराई (रा. लक्ष्मी पार्क, कोंडवे, धावडे, पुणे) यांच्याशी ओळख करून दिली. त्यानुसार 6 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांना 31 लाख 57 हजार 689 रूपयांची औषधे आणि वैद्यकीय उपकरणे दिली. त्या बदल्यात दिलेला धनादेश बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने वटला नाही. त्यांच्याशी बिलाबद्दल वारंवार संपर्क केल्यावर भावाने आत्महत्या केली, बाहेरगावी आहे, जीएसटीमुळे अडचण आहे, अशी कारणे सांगून रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर 31 लाख रूपये देणार नसल्याचे सांगू लागले. विजय ढेरे (रा. लोहगाव, ता. नेवासा), सचिन गुलदगड (रा. गुलदगडमळा, राहुरी), पुष्पक महालकर (रा. धावडे, पुणे), कांचन बराई (रा. धावडे, पुणे) या चौघांनी संगनमत करून कट कारस्थान रचून 31 लाख 57 हजार 689 रूपयांची फसवणूक केल्याने त्यांच्याविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे पुढील तपास करीत आहेत.


COMMENTS

Name

Accident,33,Ahmednagar,7224,Akole,20,braking,43,Breaking,5105,Business,4,corona,558,Crime,1423,e,2,economics,11,Editorial,29,education,146,Entertainment,1323,Epaper,29,Health,390,indan,8,India,1203,Jamkhed,45,Karjat,9,Kopargaon,6,loni,28,m,1,ma,1,Maharashtra,4807,manoranjan,13,Mumbai,203,Nagar,291,Newasa,65,Parner,3008,Parner Ahmednagar,54,Parner-news-sujit-zaware-sosiety-ele-1037893,2,Pathardi,19,Politics,1255,Rahata,45,Rahuri,19,SadPadsad,19,sampadkiy,99,Sangamner,152,Saripath,44,Shevgaon,11,shivvyakhyate-tapkir-news,1,Shrigonda,131,Shrirampur,9,Sport,271,sports,40,weather,32,World,122,
ltr
item
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री: कंत्राट मिळवून देण्याच्या आमिषाने 31 लाखांना गंडा
कंत्राट मिळवून देण्याच्या आमिषाने 31 लाखांना गंडा
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg9VcQP8clZwYID1_roPB_yiuYElWULA86CgHY9ry2JTotsOxyMM9lgEFVz3lfT30MlBhaSvqEO4--2aS2Y5xnkY6UvhTvNMOXLVhF1MpHFcF8aa-lUV6DcCy79xew6GEFUETCjULmQcLKK7gX6e1Ks5q78ge6xl4Ov82tp_3Z_L801HHYYCaKNI54G/w640-h337/download.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg9VcQP8clZwYID1_roPB_yiuYElWULA86CgHY9ry2JTotsOxyMM9lgEFVz3lfT30MlBhaSvqEO4--2aS2Y5xnkY6UvhTvNMOXLVhF1MpHFcF8aa-lUV6DcCy79xew6GEFUETCjULmQcLKK7gX6e1Ks5q78ge6xl4Ov82tp_3Z_L801HHYYCaKNI54G/s72-w640-c-h337/download.jpg
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री
https://www.nagarsahyadri.com/2022/11/AHMEDNAGAR-CRAIM-NEWS_01166814430.html
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/2022/11/AHMEDNAGAR-CRAIM-NEWS_01166814430.html
true
3854568444215913215
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content