अहमदनगर । नगर सह्याद्री मिसगर डायग्रोसिक सेंटर, मौलाना आझाद रोड, दाणेडबरा येथील ओपीडीच्या शटरला लावलेले कुलूप अनाधिकृतरित्या तोडून तेथे द...
अहमदनगर । नगर सह्याद्री
मिसगर डायग्रोसिक सेंटर, मौलाना आझाद रोड, दाणेडबरा येथील ओपीडीच्या शटरला लावलेले कुलूप अनाधिकृतरित्या तोडून तेथे दुसरे कुलूप लावल्याप्रकरणी 10 ते 15 जणांविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युनूस सुल्तान तांबटकर (वय 59 रा. घासगल्ली) यांनी फिर्याद दिली आहे.
ईक्राम नजीर तांबटकर (रा. जुनी घासगल्ली), रेहान शफी काझी (रा. रामचंद्र खुंट), ईनाम जिकरिया खान (रा. शहाजी रोड, नगर), समी जुबेर तांबटकर (रा. अंधेरी, मुंबई) व इतर 10 ते 15 अनोळखींविरूद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे. मिसगर डायग्रोसिक सेंटर फिर्यादी यांच्या ताब्यात असून त्यातील दोन गाळे डॉ. परवेज उमर शेख यांना ओपीडीसाठी दिले आहेत.
रविवारी दुपारी तीन वाजता ईक्राम, रेहान, ईनाम, समी व इतर 10 ते 15 जणांनी ओपीडीला लावलेले कुलूप तोडून तेथे दुसरे कुलूप लावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
COMMENTS