औरंगाबाद - अनुराग कश्यपचा "फाइल नंबर ३२३' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात सुनील शेट्टीही दिसणार आहे. आता या चित्रपटात ई...
औरंगाबाद -
अनुराग कश्यपचा "फाइल नंबर ३२३' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात सुनील शेट्टीही दिसणार आहे. आता या चित्रपटात ईशा गुप्ताचीही एन्ट्री झाल्याची बातमी समोर येत आहे.
या चित्रपटात ती मीरा नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे जी तिच्या आधीच्या सर्व बोल्ड भूमिकांपेक्षा खूप वेगळी असेल. ईशा नुकतीच "आश्रम ३' वेबसीरिजमध्ये दिसली होती. चित्रपटात विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची कथा दाखवण्यात येणार आहे.
याआधी ईशाच्या व्यक्तिरेखेबद्दल असे बोलले जात होते की, ती या चित्रपटात मेहुलच्या मैत्रिणीच्या भूमिकेत दिसेल, पण आता या चित्रपटात ईशाची भूमिका एका अधिकाऱ्याची असू शकते, असे समोर आले आहे. दुसरीकडे, मेहुलच्या वकिलाने चित्रपटाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. "फाइल नंबर ३२३'चे दिग्दर्शन कार्तिक करत आहे, जो दाक्षिणात्य दिग्दर्शक शंकरचा सहाय्यक आहे. हा चित्रपट किती भाषांमध्ये बनणार आहे, हे सध्या निश्चित झालेले नाही.
COMMENTS