माहेश्वरी युवक संघटनेच्यावतीने सुपर-30 या कार्यक्रमास सुरुवात अहमदनगर । नगर सह्याद्री आजची मुलं-मुली कुशाग्र बुद्धीची आहेत. इंटरनेट, मोबाई...
माहेश्वरी युवक संघटनेच्यावतीने सुपर-30 या कार्यक्रमास सुरुवात
अहमदनगर । नगर सह्याद्री
आजची मुलं-मुली कुशाग्र बुद्धीची आहेत. इंटरनेट, मोबाईल, सोशल मिडिया या माध्यमातून ते आपल्या ज्ञानात भर घालत आहेत. शिक्षणाची क्षेत्र विस्तारीत होत असतांना आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत. त्याची भविष्यातील वाटचाल आणि त्यासाठी आवश्यक ते स्कील हे प्रत्येकाकडे असणे आवश्यक आहे. माहेश्वरी युवा संघटनेने विद्यार्थी व पालकांची ही समस्या सोडविण्यासाठी सुरु केलेला सुपर-30 हा उपक्रम मार्गदर्शक व दिशादर्शक असाच आहे. त्यामुळे मुलांचे करिअर घडण्यास मोठा उपयोग होणार आहे. या माध्यमातून त्यांचे भविष्य उज्वल होईल, असे प्रतिपादन श्रीगोपाल धूत यांनी केले.
माहेश्वरी युवक संघटनेच्यावतीने सुपर-30 या कार्यक्रमाची सुरुवात श्रीगोपाल धूत यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी युवा संघटनेचे अध्यक्ष विशाल झंवर, सचिव शेखर आसावा, प्रोजेक्ट हेड गोविंद जाखोटिया, विनय मंत्री, शामा मंत्री, व्यंकटेश पुगलिया आदि उपस्थित होते.
याप्रसंगी विशाल झंवर म्हणाले, समाजातील युवक सशक्त व्हावा, त्यातील स्कील डेव्हलप व्हावे, यासाठी सुपर 30 कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यात 30 मुला-मुलींना सहभागी करुन घेत तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची कोणत्या क्षेत्रात प्रगती होऊ शकते. त्यादृष्टीने त्यांना मार्गदर्शन केले जाणार असल्याचे सांगितले.
या सुपर - 30चे कोच म्हणून विनय मंत्री, डॉ.शाम मंत्री, व्यंकटेश पुगलिया मार्गदर्शन करत आहेत. तर प्रोजेक्ट हेड म्हणून गोविंद जाखोटिया आहेत. संजय पुगलिया यांनी यासाठी प्रायोजकत्व दिले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद जाखोटिया यांनी केले तर आभार सचिव शेखर आसावा यांनी मानले. यावेळी अमित काबरा, गोविंद दरक, कुणाल लोया, शाम भुतडा, योगेश सोमाणी, पियुष झंवर, संग्राम सारडा, संकेत मानधना, मुकुंद जाखोटिया, अनिकेत बलदवा, गणेश लढ्ढा आदि उपस्थित होेते.
COMMENTS