पारनेर । नगर सह्याद्री महाराष्ट्र शासन जलसंधारण विभागाच्या माध्यमातून पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार नीलेश लंके यांच्या विशेष प्रय...
पारनेर । नगर सह्याद्री
महाराष्ट्र शासन जलसंधारण विभागाच्या माध्यमातून पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार नीलेश लंके यांच्या विशेष प्रयत्नातून पारनेर-नगर मतदार संघातील गावात 30 कोल्हापुरी बंधारे बांधण्यासाठी 29 कोटी 18 लक्ष 58 हजार 873 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यामध्ये प्रामुख्याने नगर तालुक्यातील अकोळनेर (जाधववाडी) येथे स्मशान भूमी जवळ को.प.बंधारा बांधणे-1 कोटी 23 लाख 3 हजार 864 बाबुर्डी घुमट येथे को.प.बंधारा बांधणे-72 लाख 61 हजार 999, घोसपुरी नंबर-1 येथे को.प.बंधारा बांधणे-98 लाख 64 हजार 256, कामरगाव नंबर-1 ता. नगर येथे को.प.बंधारा बांधणे-88 लाख 95 हजार 797 तर पारनेर तालुक्यातील वाघूडे खुर्द येथे दत्त मंदिर जवळ को.प.बंधारा बांधणे-99 लाख 34 हजार 638, निघोज (ढवणवाडी) को.प.बंधारा बांधणे-1 कोटी 29 लाख 1 हजार 424, राळेगण थेरपाळ (अंधारी आमराई) येथे को.प.बंधारा बांधणे-1 कोटी 12 लाख 40 हजार 470, वाघूडे बुद्रुक (दिवटे मळा) येथे को.प.बंधारा बांधणे-99 लाख 1 हजार 777, देविभोयरे (नागझिरे वस्ती) येथे को.प.बंधारा बांधणे-1 कोटी 54 लाख 95 हजार 205, निघोज (मुका मळा) येथे को.प.बंधारा बांधणे-1 कोटी 61 लाख 55 हजार 883, निघोज नंबर-6 (कवाद) येथे को.प.बंधारा बांधणे-67 लाख 49 हजार 78, निघोज (लाळगे मळा नंबर-3) येथे को.प.बंधारा बांधणे-44 लाख 69 हजार 098, निघोज (लाळगे मळा नंबर-2) येथे को.प.बंधारा बांधणे-53 लाख 86 हजार 623, निघोज नंबर-4 (तनपुरे वाडी ) येथे को.प.बंधारा बांधणे-42 लाख 21 हजार 257, कळस (चिंचबन) येथे को.प.बंधारा बांधणे-58 लाख 23 हजार 750, कळस (गावठाण) येथे को.प.बंधारा बांधणे-42 लाख 25 हजार 558, गारखिंडी (आनंदवाडी-रानुबाई) येथे को.प.बंधारा बांधणे-51 लाख 49 हजार 851, निघोज नंबर-5 (खोडा) येथे को.प.बंधारा बांधणे-41 लाख 71 हजार 280, निघोज (काळेवस्ती नंबर-1) येथे को.प.बंधारा बांधणे-74 लाख 76 हजार 198, हंगा (दळवी वस्ती चखऊउ) येथे को.प.बंधारा बांधणे-1 कोटी 65 लाख 65 हजार 29, रुईछत्रपती (चोपनवस्ती) येथे को.प.बंधारा बांधणे-1 कोटी 6 लाख 67 हजार 980, सांगवी सूर्या (रासकर मळा) येथे को.प.बंधारा बांधणे-1 कोटी 26 लाख 31 हजार 479, बाभूळवाडे (पिंपळदरा) ता.पारनेर येथे को.प.बंधारा बांधणे-1 कोटी 17 लाख 74 हजार 298, बाभूळवाडे (खानकर दरा) येथे को.प.बंधारा बांधणे-1 कोटी 33 लाख 9 हजार 815, रांजणगाव मशीद (उदारवस्ती) येथे को.प.बंधारा बांधणे-1 कोटी 61 लाख 68 हजार 971, कामरगाव (लेंडी नाला) येथे को.प.बंधारा बांधणे-82 लाख 61 हजार 499, भोरवाडी नंबर-1 ता.नगर येथे को.प.बंधारा बांधणे-91 लाख 26 हजार् 632, भोरवाडी (संगम) ता.नगर येथे को.प.बंधारा बांधणे-96 लाख 21 हजार 127, वडगाव गुप्ता नंबर-1 ता.नगर येथे को.प.बंधारा बांधणे-1 कोटी 10 लाख 78 हजार वडगाव गुप्ता (बायपास जवळ) ता.नगर येथे को.प.बंधारा बांधणे-1 कोटी 9 लाख 26 हजार असा 30 बंधारा साठी 29 कोटी 18 लक्ष 58 हजार 873 निधी मंजूर करण्यात आला आहे.
जलसंधारणाच्या माध्यमातून ऐतिहासिक निधी ः आमदार लंके
दुष्काळी पारनेरची ओळख पुसण्यासाठी जलसंधारणाच्या कामाला विशेष प्राधान्य देण्यात आले असून पारनेर नगर मतदारसंघातील 30 कोल्हापूर बंधार्यासाठी जवळपास 29 कोटी रुपयांचा निधी पहिल्यांदाच मिळाला आहे. या 30 कोल्हापूर बंधार्यांमुळे हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून याचा फायदा शेतकरी वर्गाला होणार आहे. यापुढील काळात जलसंधारण विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली आहे.
COMMENTS