वासुंदे-खडकवाडी रस्त्यासाठी ७ कोटी रुपयांचा निधी

आ. नीलेश लंके यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ  पारनेर | नगर सह्याद्री  पारनेर - संगमनेर तालुयाला जोडणारा व दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अ...

आ. नीलेश लंके यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ 

पारनेर | नगर सह्याद्री 

पारनेर - संगमनेर तालुयाला जोडणारा व दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणार्‍या वासुंदे ते खडकवाडी या ७ किलोमीटरच्या रस्त्यासाठी सात कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली आहे. शनिवार दि. १५ ऑटोबर रोजी त्याचा शुभारंभ वासुंदे येथे होणार असल्याची माहिती गुरुदत्त पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा.ठ.झावरे व माजी सरपंच महादू भालेकर व रविंद्र झावरे यांनी दिली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था झाल्याने खडकवाडी, मांडवे, पळशी, वासुंदे, माळवाडी, देसवडे, बोकनकवाडी, लाखेवाडी, शिक्री, कामटवाडी टेकडवाडी  व परिसरातील वाडी वस्तीवरील लोकांनी हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी वेळोवेळी आमदार लंके यांच्याकडे केली होती. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारच्या काळात या रस्त्यासाठी भरीव असा सात कोटी रुपये निधी रस्ता दुरुस्ती व मजबुती करण्यासाठी  प्रथमच एवढे मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला आहे. खडकवाडी वासुंदे परिसरातील १० ते १५ गावांसाठी हा रस्ता महत्त्वाचा मानला जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने शेतकरी ऊस उत्पादक कांदा उत्पादक व शाळकरी मुलांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत होता. तर हा रस्ता अरुंद असल्याने अपघातांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत चालली होती परंतु आता या रस्त्याच्या मजबुती करण व रूंदीकरणासाठी मोठा निधी मिळाल्याने या रस्त्याची दयनीय अवस्था दूर होणार असल्याची माहिती अमोल उगले, रविंद्र झावरे, सुदाम शिर्के, संचालक रावसाहेब बर्वे यांनी दिली आहे.

कामाला आधी सुरुवात मग उद्घाटन

गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या खडकवाडी ते वासुंदे रस्त्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी निधी उपलब्ध करून दिला असून यामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था दूर होणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून या सात किलोमीटरच्या रस्त्यासाठी एवढा मोठा प्रमाणावर निधी उपलब्ध करून दुर्गम भागाला खर्‍या अर्थाने न्याय दिला असल्याची प्रतिक्रिया गुरुदत्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा.ठ.झावरे व ग्रामपंचायत सदस्य पोपटराव साळुंके व ज्येष्ठ नेते भागूजी दादा झावरे यांनी व्यक्त केली आहे.

नुसते नारळ न फोडता प्रत्यक्ष कामाला सुरुवात

पारनेर तालुयातील अनेक स्वयंघोषित नेते गावागावात व चौका चौकात नारळ फोडण्यात व फलक लावण्यात पटाईत असून आम्ही मात्र या वासुंदे ते खडकवाडी या रस्त्यासाठी ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून गेल्या ४ महिन्यापासून हे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे इतरांसारखी नुसते नारळ न फोडता किंवा फलक न लावता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून मगच उद्घाटन करत असतो असा टोला आमदार लंके यांनी विरोधकांना लगावला आहे.

COMMENTS

Name

Accident,38,Ahmednagar,7279,Akole,20,braking,45,Breaking,5138,Business,5,corona,565,Crime,1454,e,2,economics,11,Editorial,29,education,146,Entertainment,1347,Epaper,29,Health,401,indan,8,India,1233,Jamkhed,46,Karjat,9,Kopargaon,6,loni,28,m,1,ma,1,Maharashtra,4914,manoranjan,14,Mumbai,229,Nagar,291,Newasa,65,Parner,3036,Parner Ahmednagar,57,Parner-news-sujit-zaware-sosiety-ele-1037893,2,Pathardi,19,Politics,1286,Rahata,45,Rahuri,19,SadPadsad,19,sampadkiy,99,Sangamner,155,Saripath,44,Shevgaon,11,shivvyakhyate-tapkir-news,1,Shrigonda,136,Shrirampur,9,Sport,272,sports,43,weather,32,World,131,
ltr
item
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री: वासुंदे-खडकवाडी रस्त्यासाठी ७ कोटी रुपयांचा निधी
वासुंदे-खडकवाडी रस्त्यासाठी ७ कोटी रुपयांचा निधी
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhNBFsFeh62inhXh_155rQsSIuMBW5EO_yMbJpxLkVf9zMOHb8ucSlXCbgoEJ7I5HQxWe3_ZLtjbm4VRecjLQuUa8pyH1n5h3esmPanVN9x6fK8GH7IdN12S6c6P4uGSUNjyOf_ajTjX_AEPN5NS4_f_pv6k6bCc44TNapsjrgLt8Bh5S2qbAMPDqNI/s16000/lanke.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhNBFsFeh62inhXh_155rQsSIuMBW5EO_yMbJpxLkVf9zMOHb8ucSlXCbgoEJ7I5HQxWe3_ZLtjbm4VRecjLQuUa8pyH1n5h3esmPanVN9x6fK8GH7IdN12S6c6P4uGSUNjyOf_ajTjX_AEPN5NS4_f_pv6k6bCc44TNapsjrgLt8Bh5S2qbAMPDqNI/s72-c/lanke.jpg
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री
https://www.nagarsahyadri.com/2022/10/vasunde-khadakvadi-rasta-7-koti-rupyancha-nidhi-latest-update.html
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/2022/10/vasunde-khadakvadi-rasta-7-koti-rupyancha-nidhi-latest-update.html
true
3854568444215913215
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content