अहमदनगर | नगर सह्याद्री गुरुवारी (दि. २०) अहमदनगर शहरास पाणीपुरवठा करणारी नवीन मुख्य ८१३ एमएम जलवाहिनी विळद घाट येथील ओम गुरूदेव आश्रमसमो...
अहमदनगर | नगर सह्याद्री
गुरुवारी (दि. २०) अहमदनगर शहरास पाणीपुरवठा करणारी नवीन मुख्य ८१३ एमएम जलवाहिनी विळद घाट येथील ओम गुरूदेव आश्रमसमोर फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दिवाळी तोंडावर आली असून, वसू बारसेच्या दिवशीच पाणी समस्येला तोंड देण्याची वेळ नगरकरांवर आली आहे.
सायंकाळी चारच्या दरम्यान अहमदनगर शहरास पाणीपुरवठा करणारी नवीन मुख्य ८१३ एमएम जलवाहिनी विळद घाट येथील ओम गुरूदेव आश्रम समोरील ठिकाणी पाण्याच्या व हवेच्या दाबाने फुटली आहे. जलवाहिनी दुरूस्तीचे काम महापालिकेने तातडीने हाती घेत ती दुरूस्त केली. मात्र या कामास अवधी लागल्याने जलवाहिनीद्वारे होणारा पाणी उपसा बंद ठेवण्यात आला. त्यामुळे शहर वितरण व्यवस्थेच्या पाण्याच्या टाया वेळेत भरणे शय होणार नाही. त्यामुळे शुक्रवारी (दि. २१) रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्जेपुरा, तोफखाना, सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, ख्रिस्तगल्ली, माळीवाडा, माणिकचौक, आनंदी बाजार, जुने मनपा कार्यालय परिसर, पंचपीर चावडी, बालिकाश्रम रोड परिसर इत्यादी ठिकाणी उशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
तसेच काल दि. १९ रोजी खंडित वीज पुरवठयामुळे बुरूडगाव रोड, सारसनगर, स्टेशन रोड इत्यादी उपनगर भागास दि. २१ रोजी पाणीपुरवठा नेहमीच्या वेळेत करणेत येणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन मनपाने केले आहे.
COMMENTS