मुंबई । नगर सह्याद्री - निवडणूक आयोगाच्या शिवसेनेच्या निकालानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला चार पानां...
मुंबई । नगर सह्याद्री -
निवडणूक आयोगाच्या शिवसेनेच्या निकालानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला चार पानांचे खरमरीत पत्र लिहीले आहे. या पत्राद्वारे त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आमच्या पक्षाला (ठाकरे गटाला) सापत्न वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयातील वकील अॅडव्होकेट विवेक सिंह यांनी उद्धव ठाकरेंच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाला हे चार पानांचे पत्र लिहीले आहे. या पत्रात उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून एकूण १२ मुद्दे मांडण्यात आले आहे. या पत्रात उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे. पत्रात म्हटले आहे की, केंद्रीय निवडणूक आयोग आमच्या पक्षाला (ठाकरे गटाला) सापत्य वागणूक देत आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आमच्या पक्षासोबत भेदभाव करीत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोग प्रतिवादी एकनाथ शिंदे गटाला प्राधान्य देत असल्याचा आरोपही या पत्राद्वारे करण्यात आला आहे. शिंदे गट निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर देखील कागदपत्र देत नाही. मात्र, आम्ही दिलेली कागदपत्रे शिंदे गटाला दिली जातात आणि पण त्यांची कागदपत्रे आम्हाला दिली जात नाही असाही आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जो पक्ष निवडणूक लढवीत नाही तरी पण त्याच्यासाठी आमच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह रद्द केले जाते असे म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील दोन्ही गटांना वेगवेगळी नावे आण चिन्ह दिले आहे. तसेच शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरते गोठवण्यात आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह दिले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटाला ढाल-तलवार हे चिन्ह दिले आहे. त्याचप्रमाणे 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव एकनाथ शिंदेंच्या गटाला, तर उद्धव ठाकरेंच्या गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव देण्यात आले आहे.
COMMENTS