मुंबई । नगर सह्याद्री - निवडणूक आयोगाने शिवसेनेबाबत मोठा निर्णय दिल्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात उद्धव ठाकरे हायकोर्टात जा...
मुंबई । नगर सह्याद्री -
निवडणूक आयोगाने शिवसेनेबाबत मोठा निर्णय दिल्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात उद्धव ठाकरे हायकोर्टात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली हायकोर्टात आजच रिट याचिका दाखल केली जाणार आहे. निवडणूक आयोगाने सुनावणी घेतली नाही, ठाकरे गटाचा युक्तीवाद मांडण्याची संधी दिली नाही अशा प्रकारची भूमिका दिल्ली हायकोर्टामध्ये उद्धव ठाकरे मांडण्याची शक्यता आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. शिंदे गटाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावर दावा केला आहे. त्यानंतर शिवसेना नेमकी कुणाची? हा तिढा सुप्रीम कोर्टात प्रलंबीत असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आयोगाने गोठवले आहे.
शनिवारी निवडणुक आयोगाने हा निर्णय दिला आहे. त्यानंतर आता निवडणूक आयोगाच्या आदेशाला ठाकरे गट हायकोर्टात जाणार असल्याचे बोलले जात आहे. दिल्ली हायकोर्टात आजच रिट याचिका दाखल केली जाणार आहे. त्यामुळे आता दिल्ली हायकोर्टात कधी सुनावणी होते आणि काय निर्णय येतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
COMMENTS