अहमदनगर | नगर सह्याद्री श्री क्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराच्या पालखीचा मान असलेल्या बुर्हाणनगर येथील भगत कुटुंबियांकडून गेल्या...
अहमदनगर | नगर सह्याद्री
श्री क्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराच्या पालखीचा मान असलेल्या बुर्हाणनगर येथील भगत कुटुंबियांकडून गेल्या १ हजारपेक्षा अधिक वर्षांपासून धार्मिक क्षेत्रात कार्य केले जात आहे. याबद्दल तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने विजयादशमी निमित्त आयोजित सिमोलंघन व पालखी सोहळ्या निमित्त पालखीचे मुख्य मानकरी अॅड. विजय भगत, अॅड.अभिषेक भगत व भगत कुटुंबियांचा धाराशिवचे जिल्हाधिकारी व तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष सचिन ओंबासे व आमदार राणाजगजितसिह पाटील यांनी सन्मान केला आहे.
यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, प्रांतधिकारी खरमाळे, पोलीस निरीक्षक काशीद, सतिश खाडे साहेब, सर्व पुजारी आदींसह मंदिराचे ट्रस्टी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी बुर्हाणनगर तुळजाभवानी मंदिर देव्हाराचे सौ.दुर्गा भगत, कविता भगत, राजेंद्र भगत, किरण भगत, सुभाष भगत, मनीषा भगत, कुणाल भगत, अजिंय भगत, रोहन भगत, संकेत भगत, वेद भगत, अमोल भगत आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सचिन ओंबासे म्हणाले, महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या सिमोलंघनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही बुर्हाणनगरच्या भगत कुटुंबातुन आलेल्या पालखी मधून तुळजाभवानी देवीची मिरवणूक काढत सिमोलंघन करण्यात आले. या पालखीला विशेष महत्त्व असून, या पालखीचा मान असलेले नगरचे भगत कुटुंबिय चांगल्या पद्धतीने हजारो वर्षांपासून ही सेवा बजावत आहेत. अॅड. अभिषेक भगत म्हणाले, आई तुळजाभवानीची पालखी विजयादशमीनिमित्त नगरहून येथे येते. या आमच्या हस्ते मंदिरामध्ये अनेक महत्वाचे विधि पार पडले जतात. बुर्हाणनगर हे माहेर तर तुळजापुर हे सासर मानले जाते. साक्षात देवीने आमच्या कुटुंबामध्ये १२ वर्षे वास्तव्य केलेले आहे. त्यामुळे पालखीचा मान बुर्हानगरच्या भगत कुटुंबियांना गेल्या हजारो वर्षांपासून मिळत आहे. आम्ही आमच्या पूर्वजांची ही परंपरा जपली आहे. यामध्ये एकदाही खंड पडलेला नाही. त्यामुळे आम्ही भगत कुटुंबीय स्वतःला पुण्यवान समजतो. यापुढेही अनंत काळासाठी आमच्या हातून ही सेवा घडणार आहे.
COMMENTS