मुंबई । नगर सह्याद्री - शिवसेने बाबत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दिलेले मशा...
मुंबई । नगर सह्याद्री -
शिवसेने बाबत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दिलेले मशाल हे निवडणूक चिन्ह आमचे असल्याचा दावा समता पक्षाने केल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
1994 पासून राष्ट्रीयीकृत मशाल हे चिन्ह आमचे आहे असा दावा समता पक्षाकडून करण्यात आला आहे. हे चिन्ह ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकी करता दिले आहे. यावर हरकत घेत समता पक्षाने निवडणूक आयोगकडे हे चिन्ह आमचे असल्याचा दावा करत ते पुन्हा आम्हाला मिळावे अशी मागणी ईमेल द्वारे केली आहे.
मात्र, निवडणूक आयोगाकडून 2004 पासून समता पक्षाने निवडणूक लढवली नसल्याने हे चिन्ह आता ठाकरेंच्या शिवसेनेला दिले असल्याची माहिती समता पक्षाच्या अध्यक्षांना दिली आहे. तर याबाबत समता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी निवडणूक आयोगाला लेखी पत्र दिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 2014 ला आणि 2021 मध्ये बिहार ग्रामपंचायतींमध्ये आम्ही कुठल्या चिन्हावरती निवडणूक लढवल्या?
असा सवाल त्यांनी निवडणूक आयोगाला केला आहे. तर दुसरीकडे धनुष्यबाण गेल्यानंतर शिवसेनेला जसे दुःख झाले तसंच दुःख आम्हाला होत असल्याचे सांगत झारखंडमध्ये धनुष्यबाण हे चिन्ह झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाकडे आहे तर हा पक्ष महाराष्ट्र मध्ये येऊन धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवली तर शिवसेनेला चालेल का?
असाच सवाल करत उद्धव ठाकरे यांही देखील याबाबत आपले मत जाहीर करण्याचे आवाहन देवळेकर यांनी केले आहे. त्याचबरोबर मशाल या चिन्हावरून सुरू असलेल्या वादामुळे समता पार्टीच्या कार्यकर्त्यात व उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होण्याची शक्यता असल्यामुळे वर्तक प्रदेशाध्यक्षांनी पोलिसांकडून सुरक्षा मागितली आहे.
COMMENTS