मुंबई । नगर सह्याद्री - निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर आता ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात सुरू असलेल्या वादाचा...
मुंबई । नगर सह्याद्री -
निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर आता ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात सुरू असलेल्या वादाचा पुढचा अंक सुरू झाला आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटाला नवीन नाव आणि पक्षचिन्हांचे तीन-तीन पर्याय देण्यास सांगितले होते. त्यामुळे आता दोन्ही गटांकडून नवीन चिन्हासाठी नावे सादर करण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणजे ठाकरे आणि शिंदे गटाने निवडणूक चिन्हासाठी सूचवलेल्या तीन-तीन नावांपैकी प्रत्येकी दोन-दोन नावे ही सारखीच आहे. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे त्रिशूल, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल ही नावे सूचवण्यात आली तर शिंदे गटाकडून त्रिशूल, उगवता सूर्य आणि गदा ही नावे सूचवण्यात आली आहे.
विशेषत: यातील त्रिशूल या चिन्हावर दोन्ही गटांकडून दावा करण्यात आला आहे. पण त्रिशूल चिन्ह दोन्ही गटाला मिळण्याची कमी शक्यता आहे. कारण, धार्मिक चिन्हावरून याआधीच सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे.
दरम्यान, दोन्ही गटांकडून नवीन निवडणूक चिन्हासाठी सारखीच नावे सूचवण्यात आल्याने शिंदे आणि ठाकरे गटात वादाचा पुढचा अंक सुरू होतोय का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग नवीन चिन्हाबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
COMMENTS