कोहकडीत लहान मुलांसाठी नेत्र, स्त्रीरोग तपासणी शिबीर पारनेर | नगर सह्याद्री समाजामध्ये शिक्षणाबरोबर नितीमत्तेचे संस्कार होणे ही काळाची गरज...
कोहकडीत लहान मुलांसाठी नेत्र, स्त्रीरोग तपासणी शिबीर
पारनेर | नगर सह्याद्रीसमाजामध्ये शिक्षणाबरोबर नितीमत्तेचे संस्कार होणे ही काळाची गरज असल्याचे मत डॉ. स्वाती साहेबराव पानगे यांनी व्यक्त केले. मंगळवार दि. १८ ऑटोबर रोजी संगम प्रतिष्ठान व ग्रामपंचायत कोहकडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र, स्त्रीरोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. शिबीराचे उद्घाटन माजी सभापती सुदाम बबन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरामध्ये डॉ. एकनाथ साळुंके यांनी लहान मुलांची डोळ्यांची प्रथम तपासणी जन्मतः. दुसरी तपासणी तिसर्या वर्षी व तिसरी तपासणी वयाच्या सहाव्या वर्षी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे महत्व पालक, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षक व राजकीय लोकप्रतिनिधी यांना मार्गदर्शन करताना आळशी डोळा मुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी होईल यासाठी समाजातील सर्व स्तरातील लोकांना याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. लहान वयात मुलांच्या डोळ्यांचे विकार निदान करता आले तर त्यावर योग्य ट्रीटमेंट करून पुढील पिढीचे भवितव्य धोयात येऊ नये याची काळजी घेता येईल असे आश्वासित केलें व सर्व लहान मुलांची डोळ्यांची तपासणी केली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. स्वाती साहेबराव पानगे स्त्रीरोगतज्ञ शिरुर यांनी महिलांची आरोग्य तपासणी करून महिलांनी आपल्या रोजच्या आहारात सकस आहार घेणे गरजेचे आहे व महिलांमध्ये रक्ताचे प्रमाण वाढण्यासाठी गुळ शेंगदाणे, काळी खजूर, काळे मनुके, बीट, गाजर, टोमॅटो व पिवळ्या, लाल हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा. स्वयंपाक करताना लोखंडी तवा, कढईचा वापर करून शरीरात नैसर्गिक लोहाचे प्रमाण वाढले तर रक्त वाढीसाठी गोळ्या घ्याव्या लागणार नाहीत. घरातली महिला निरोगी असेल तर ते कुटूंब निरोगी, सुसंस्कृत होऊ शकते व पुढील पिढीचे भवितव्य सुदृढ जन्माला येऊ शकते. स्त्री भ्रूणहत्या ही समस्या सुशिक्षित समाजामध्ये होत आहे आदिवासी भागात पाहायला मिळत नाही. समाजामध्ये शिक्षणाबरोबर नितीमत्तेचे संस्कार होणे ही काळाची गरज आहे. निरोगी सुसंस्कृत, निर्व्यसनी व चारित्र्यसंपन्न पिढ्या घडवाच्या असतील तर महिलांनी सावित्रीच्या,जिजाऊंच्या, आहिल्ल्येच्या व रमाबाईंच्या डोळ्यातलं स्वप्नं पाहिलं पाहिजे. ज्या महिलांना रक्ताची कमी आहे त्यांना मोफत रक्त वाढीच्या गोळ्या वाटप करण्यात आल्या. महिला रुग्णांची तपासणीसाठी डॉ. तृप्ती तुषार नरवडे यांनी मदत केली. उपस्थित सर्व महिला रूग्णांचे, लहान मुले, पालक, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षक, व ग्रामंचायत कर्मचारी यांचे आभार लोकनियुक्त सरपंच डॉ. साहेबराव नामदेव पानगे यांनी मानले.
COMMENTS