आयुक्तांच्या भेटीनंतरही राजीनामा प्रलंबितच

लटके यांच्या उमेदवारीवरून ठाकरे गटात खलबतं: दुसरा उमेदवार देणार? मुंबई । नगर सह्याद्री   अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भर...

लटके यांच्या उमेदवारीवरून ठाकरे गटात खलबतं: दुसरा उमेदवार देणार?


मुंबई । नगर सह्याद्री 

 अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा अद्याप बृहन्मुंबई महापालिकेने मंजूर केला नाही. बुधवारी याबाबत लटके यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेतली. मात्र, राजीनामा मंजुरीबाबत निर्णय झाला नाही. त्यामुळे लटके यांची उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

लटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून गुरुवारी यावर सुनावणी होणार आहे. अंधेरी पूर्वचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाल्याने पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी देण्याचे ठरले आहे. लटके या मुंबई महापालिकेत के ईस्ट कार्यालयात कार्यकारी सहायक (क्लार्क) म्हणून कार्यरत आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नियमानुसार त्यांना राजीनामा देणे आवश्यक असल्याने त्यांनी २ सप्टेंबरला नोकरीचा राजीनामा दिला. त्यात त्यांनी विशेष बाब म्हणून राजीनामा मंजूर करण्यासाठीचा अर्ज, असे नमूद केल्याने प्रशासनाने २९ सप्टेंबरला अर्ज मंजूर करता येणार नाही, असे लटके यांना कळवले. त्यामुळे लटके यांनी ३ ऑक्टोबरला पुन्हा नव्याने राजीनाम्यासाठी पालिकेकडे अर्ज केला. त्यात त्यांनी लवकरात लवकर राजीनामा मंजूर करण्याची विनंती केली आहे. अर्जानंतर एक महिन्याचा नोटीस कालावधी हा नियम असल्याने एक महिन्याचे वेतन त्यांनी पालिकेकडे भरले आहे.

शुक्रवारी १४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. अर्ज भरण्यापूर्वी नोकरीचा राजीनामा देणे आवश्यक असते. मात्र, राजीनामा मंजुरीबाबत काहीही कळवण्यात आले नसल्याने त्यांनी बुधवारी पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांची भेट घेतली. १४ ऑक्टोबरच्या आत अर्ज मंजूर होईल याबाबत काहीही ठोस उत्तर न मिळाल्याने लटके यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राजीनामा देताना कायम, हंगामी कर्मचार्‍यांनी राजीनाम्याची एक महिना अगोदर नोटीस देणे आवश्यक आहे. राजीनाम्याची नमूद केलेली तारीख अमलात यावयाच्या कमीत कमी एक महिना अगोदर त्याने लेखी सूचना पत्र (नोटीस) देणे आवश्यक असते. त्याप्रमाणे सूचना पत्र दिले नसेल तर त्याने राजीनामा स्वीकृतीवेळी तो ज्या पदाचा राजीनामा देत आहे त्या पदाच्या एक महिन्याच्या वेतनाएवढी रक्कम मनपात भरली पाहिजे. राजीनामा स्वीकारल्याचे लेखी कळवेपर्यंत संबंधितांची मनपातील नोकरी सुरू राहील.


निवडणुकीचा अर्ज सादर करताना ऑफिस ऑफ प्रॉफिट (लाभाचे पद) म्हणजे सरकारी नोकरी, कंत्राट, समिती सदस्य इत्यादी असता कामा नये. अर्ज सादर करतेवेळी तुम्ही राजीनामा दिलेला असला पाहिजे, अन्यथा छाननीमध्ये तुमचा अर्ज बाद हाऊ शकतो. - अनंत कळसे, विधिमंडळाचे प्रधान सचिव, निवृत्त, मुंबई.

ऋतुजा लटके यांच्या राजीनामा अर्जाबाबतची प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. ३ ऑक्टोबरला लटके यांनी राजीनामा दिला आहे. अजून या अर्जाला ३० दिवस पूर्ण झालेले नाहीत. आमच्यावर कोणताही दबाव नाही. आम्ही नियमाप्रमाणेच काम करतोय. 

- इक्बालसिंह चहल, पालिका आयुक्त, बृहन्मुंबई.

महाडेश्वर, सावंतांच्या नावाची चर्चा

ऋतुजा लटके यांची उमेदवारी रद्द झाल्यास प्लॅन बी म्हणून माजी मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांचे विश्वासू प्रमोद सावंत तसेच मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची उमेदवारी मिळू शकते. या शक्यतेबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.


COMMENTS

Name

Accident,33,Ahmednagar,7224,Akole,20,braking,43,Breaking,5105,Business,4,corona,558,Crime,1423,e,2,economics,11,Editorial,29,education,146,Entertainment,1323,Epaper,29,Health,390,indan,8,India,1203,Jamkhed,45,Karjat,9,Kopargaon,6,loni,28,m,1,ma,1,Maharashtra,4807,manoranjan,13,Mumbai,203,Nagar,291,Newasa,65,Parner,3008,Parner Ahmednagar,54,Parner-news-sujit-zaware-sosiety-ele-1037893,2,Pathardi,19,Politics,1255,Rahata,45,Rahuri,19,SadPadsad,19,sampadkiy,99,Sangamner,152,Saripath,44,Shevgaon,11,shivvyakhyate-tapkir-news,1,Shrigonda,131,Shrirampur,9,Sport,271,sports,40,weather,32,World,122,
ltr
item
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री: आयुक्तांच्या भेटीनंतरही राजीनामा प्रलंबितच
आयुक्तांच्या भेटीनंतरही राजीनामा प्रलंबितच
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiuxH02MiHdv2Ui_A90_h_nkPFZwjbBOlI4oxPY5GmO05Wp7vn98CIpx5flXVecbpp0_2g1SNItMQzAgxVVOMtceWa87HH8qLc9-CAk_FesYXtAvSCFEpznw0fbtqpqAnitk2nlEGLGq47Rk3-1kSuzSbYnZhNOXyUs5C5MrxE7nvXv8Z_5VFzwVelq/s16000/sushma%20latke.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiuxH02MiHdv2Ui_A90_h_nkPFZwjbBOlI4oxPY5GmO05Wp7vn98CIpx5flXVecbpp0_2g1SNItMQzAgxVVOMtceWa87HH8qLc9-CAk_FesYXtAvSCFEpznw0fbtqpqAnitk2nlEGLGq47Rk3-1kSuzSbYnZhNOXyUs5C5MrxE7nvXv8Z_5VFzwVelq/s72-c/sushma%20latke.jpg
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री
https://www.nagarsahyadri.com/2022/10/sushmita-latke-shivsena-latest-update.html
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/2022/10/sushmita-latke-shivsena-latest-update.html
true
3854568444215913215
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content