इनरव्हील लबच्यावतीने भाजी विक्रेते, ग्राहकांना कापडी पिशव्याचे वाटप अहमदनगर | नगर सह्याद्री प्लास्टिकचे विघटन ३०० वर्ष होऊ शकत नाही त्याचा ...
इनरव्हील लबच्यावतीने भाजी विक्रेते, ग्राहकांना कापडी पिशव्याचे वाटप
अहमदनगर | नगर सह्याद्रीप्लास्टिकचे विघटन ३०० वर्ष होऊ शकत नाही त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. या गोष्टीचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा होणारा र्हास टाळण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे गरजेचे आहे. याबाबत समाजात जागृती होणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने इनरव्हिल लब ऑफ अहमदनगर ने एक छोटेसे पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन अध्यक्षा सौ.सुजाता कटारिया यांनी केले.
इनरव्हील लब ऑफ अहमदनगरच्यावतीने मार्केट यार्ड, महात्मा फुले चौक येथे भाजी - फळ विक्रेते तसेच ग्राहकांना कापडी पिशवी वापरावी व प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळावा आणि पर्यावरणाचे रक्षण करावे यासाठी प्रबोधन रॅली काढण्यात आली. या रॅलीत अध्यक्षा सौ.सुजाता कटारिया, सेक्रेटरी गायत्री पित्रोडा, सौ.मधुबाला चोरडिया, सौ.नूतन चोरडिया, सौ.मीनल बोरा, सौ.सुजाता गांधी आदिंसह सदस्य सहभागी झाले होते.
यावेळी ग्राहक भगिनींना ज्यांच्या हातात प्लास्टिकच्या पिशव्या होत्या त्या पिशव्या मधील भाजीपाला कापडी पिशवी टाकून त्यांना कापडी पिशवी वापरण्यासाठी आवाहन करण्यात आले. नागरिकांनी व भाजी फळ विक्रेत्यांनी उपक्रमास उत्तम प्रतिसाद दिला.
यावेळी गायत्री पित्रोडा म्हणाल्या, प्लास्टिकचे उच्चाटन करण्यासाठी इनरव्हील लबने मोहिम हाती घेतली असून, त्यासाठी समाजातील गरीब भगिनींकडून या पिशव्या बनवून घेण्यात आल्या आणि साधारण दीडशे कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले एकूण ५०० पिशव्या वाटप करण्याचा लबचा मानस असल्याचे सांगितले.
या उपक्रमास रोटरी लब ऑफ अहमदनगर सेंट्रल चे सदस्य मनीष बोरा तसेच सुनील कटारिया आदि उपस्थित होते.
COMMENTS