जामखेड | नगर सह्याद्री केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व चिन्ह धनुष्यबाण गोठवण्याचा प्रकार म्हणजे पक्ष तोडण्याचा प्रकार आहे. यामुळे नि...
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व चिन्ह धनुष्यबाण गोठवण्याचा प्रकार म्हणजे पक्ष तोडण्याचा प्रकार आहे. यामुळे निष्ठावंत शिवसैनिक यांचा आवाज कोणी दाबू शकत नाही ते आणखी निष्ठेने व सर्वसामान्य लोकांत असलेला उत्साह पाहून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबई पोटनिवडणूक व महानगरपालिका मन ओतून जिंकतील असा विश्वास आ. रोहीत पवार यांनी व्यक्त केला आहे.
आ. पवार मातोश्री लाल आखाडा संस्थेच्यावतीने आयोजित आरती व महाप्रसाद कार्यक्रमासाठी आले असताना बोलत होते.
यावेळी आ. पवार म्हणाले, निवडणूक आयोगाने नाव व चिन्ह गोठवल्यामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांना धक्कादायक आहे. तर राजकीय पक्षाच्या नेत्यांना हा निर्णय अपेक्षित होता. हा प्रकार पार्टी तोडण्याचा आहे. यामागचे कारण म्हणजे भाजपचा मोठा नेता व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केले होते की, पार्टी तोडण्यासाठी आम्ही मोठे नियोजन केले होते. म्हणजे त्यांचे नियोजन नाव व चिन्ह गोठवण्याबाबत असेल यामागे नक्कीच कोणी ना कोणी असू शकतो. निष्ठावंत शिवसैनिकांचा आवाज कोणी दाबू शकत नाही, याचे पडसाद आगामी निवडणूक काळात दिसून येतील.
COMMENTS