जिल्ह्यात 32 हजारांवर लाभार्थी - जिल्हा उपनिबंधक पुरी अहमदनगर । नगर सह्याद्री महात्मा फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेंतर्गत पहिल्या टप्...
जिल्ह्यात 32 हजारांवर लाभार्थी - जिल्हा उपनिबंधक पुरी
अहमदनगर । नगर सह्याद्री
महात्मा फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 32 हजार 597 शेतकर्यांना फायदा मिळाला असून, त्यांनी कर्जफेड केल्याबद्दल प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिली.
या संदर्भात पुरी म्हणाले, कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकर्यांची यादी शासनाने प्रसिद्ध केली आहे. या नुसार अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची यादीनुसार 32 हजार 597 शेतकर्यांना याचा लाभ मिळणार आहे. ही यादी फक्त जिल्हा मध्यवर्ती बँकेची आहे. इतर बँकांची यादी वेगळी आहे. या योजनेंतर्गत ज्यांचे पन्नास हजारांपेक्षा जास्त कर्ज होते आणि ते परतफेड केलेले आहे, त्यांना प्रोत्साहनपर म्हणून 50 हजार रूपये देण्यात येणार आहेत. तसेच ज्यांचे 50 हजारांच्या आत कर्ज होते, त्यांना तेवढी पूर्ण रक्कम प्रोत्साहनपर देण्यात येणार आहे.
पात्र शेतकर्यांची यादी बँकेच्या संबंधित तालुका कार्यालयात, शाखेत आणि गावांच्या सोसायटी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानुसार यादीत असलेल्या शेतकर्यांनी आधार कार्ड, विशिष्ट क्रमांक यादीतील क्रमांक घेऊन संबंधित कार्यालयात जायचे आहे. आधार अॅथेंटिशियनसाठी तेथे सुविधा करण्यात आली असून, तेथे जाऊन थंब इम्प्रेशन करावयाचे आहे. या यादीत नाव नसलेल्या पात्र शेतकर्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. ही यादी पहिल्या टप्प्यातील आहे. दुसरी यादीत त्यांचे नाव येईल, असेही पुरी यांनी म्हटले आहे.
COMMENTS