नवी दिल्ली । वृत्तसंस्था येत्या रब्बी पिकांचे किमान हमीभाव म्हणजे एमएसपी जाहीर करून केंद्र सरकारने देशभरातील बळीराजाला दिवाळीची दुसरी भेट द...
नवी दिल्ली । वृत्तसंस्था
येत्या रब्बी पिकांचे किमान हमीभाव म्हणजे एमएसपी जाहीर करून केंद्र सरकारने देशभरातील बळीराजाला दिवाळीची दुसरी भेट दिली आहे. गव्हाची एमएसपी 2015 रुपयांवरून 2125 क्विंटल म्हणजे 110 रुपयांनी वाढवली आहे. तर हरभर्याचा एमएसपी 1635 वरून 1735 म्हणजे 105 रुपयांनी वाढवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
सन 2023-24 सालासाठी सहा रब्बी पिकांच्या किमान हमीभावाच्या वाढीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. त्यानुसार गहू, हरभर्याप्रमाणेच इतर महत्त्वाच्या चार रब्बी पिकांचा एमएसपी वाढवला आहे. मसूरचा एमएसपी सर्वाधिक 500 रुपये वाढून 6 हजार रुपये क्विंटल झाली आहे. तर रेपसीड (पांढरी मोहरी) आणि पिवळी मोहरीची एमएसपी प्रति क्विंटल 400 रुपयांनी वाढवून 5050 रुपयांवरून 5450 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. करडईची एमएसपी 5 हजार 441 होता. तो 209 रुपयांनी वाढून 5 हजार 650 रुपये क्विंटल झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या पिकांच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे.
2018-19 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात उत्पादन खर्चाच्या 1.5 पट एमएसपी देण्याच्या घोषणेच्या अनुषंगाने रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केल्याचा सरकारचा दावा आहे. तसेच पांढरी आणि पिवळी मोहरीवर 104 टक्के परतावा मिळेल असा सरकारचा दावा आहे. गव्हावर 100 टक्के, मसूरवर 85 टक्के, हरभर्यावर 66 टक्के, करडईवर 50 टक्के परतावा मिळत आहे.
कृषी तेलबिया आणि कडधान्यांचे उत्पादन वाढवण्यावर सरकार सातत्याने लक्ष केंद्रित करत असून त्याचे परिणामही दिसू लागले आहेत. तेलबियांचे उत्पादन 2014-15 मधील 27.51 दशलक्ष टनावरून 2021-22 मध्ये 37.70 दशलक्ष टनापर्यंत वाढवण्यात यश आले आहे. डाळींचे उत्पादन वाढवण्यातही यश आले आहे.
COMMENTS