मुंबई । नगर सह्याद्री - शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हावर शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी दावा केला होता. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसे...
मुंबई । नगर सह्याद्री -
शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हावर शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी दावा केला होता. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष चिन्हाबाबत काल मोठा निर्णय दिला आहे. त्यानुसार आता शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नावे दोन्ही गट येऊ घातलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत वापरु शकणार नाहीत असा मोठा निर्णय आयोगाने दिल्यामुळे शिंदे व ठाकरे दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे.
आयोगाच्या याच निर्णयावर आता आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केले आहे. पवार म्हणाले, हे होणार याची मला खात्री होती. असे काही घडेल असे माझे मन सांगत होते आहे. तसंच योग्य निर्णय दिले जातील याची खात्री नाही असे म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
तर आपण देखील अनेकवेळा अनेक चिन्हांवरती निवडणुका लढविल्या आहे. चिन्हाचा काही फरक पडत नाही. शेवटी जनता सर्व काही ठरवते असंही ते म्हणाले आहे. तसेच या सर्व परिस्थित आता शिवसेनेने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे असेही पवार म्हणाले आहे.
COMMENTS