मुंबई । नगर सह्याद्री - पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिवाळी आता तुरुंगातच होणार आहे. क...
मुंबई । नगर सह्याद्री -
पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिवाळी आता तुरुंगातच होणार आहे. कारण न्यायालयाने त्यांची जामिनासंदर्भातील सुनावणी 2 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.
ईडीने जे आरोप केलेले आहे, त्याचा कुठलाही संबध लागत नाही. यात संजय राऊत यांचा प्रत्यक्षरित्याकाहीही संबध लागत नाही. प्रविण राऊत यांना जे पैसे मिळाले ते पीएमसी बँकेशी संदर्भात होते. पण राऊत यांचा काहीही संबध नसताना त्यांची प्रॉपर्टी का जप्त केली आहे. असा युक्तीवाद राऊतांच्या वकिलांनी आज कोर्टात केला आहे.
प्रविण राऊत यांच्याकडून आलेत म्हणजे ते पीएमसी बॅकेच्या गैरव्यवहार संबधतीतच आहे. असे नाही. त्यात अनेकांनी पैसे स्वीकारलेले आहे. यात अशाही दोन व्यक्ती आहे. त्यांनीही पैसे दिलेले आहे. मग ते कुठे आहे. स्वप्ना पाटकरांनी त्यांच्या जबाबातही म्हटले आहे की, मी कुणालाही भेटलेले नाही. सुजीत पाटकर यांनी म्हटलयं जे व्यवहार झालेत स्वप्ना पाटकरांच्या कार्यालयात झाले असून ते व्यवहार स्वप्ना पाटकर यांनी केलेले आहे. असंही वकिलांनी कोर्टात सांगितले आहे.
इथे फक्त पैसे दिलेल आहेत पण कुणी कुणाला देले ते स्पष्टच होत नाही. जो तो एकमेकांकडे बोट दाखवत आहे. प्रत्येकाने काही ना काही केले आहे. तर जबाबात साम्य का नाही. वेळोवेळी जबाब बदलत आहे. त्यामुळे संजय राऊतांचा सहभाग स्पष्ट नाही. मग त्यावर कसा विश्वास ठेवायचा. हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. त्यामुळे ईडीला आपलं उत्तर दाखल करू द्या, त्यावर आम्ही उत्तर देतो, असं राऊतांच्या वकिलांनी म्हटले आहे.
COMMENTS