बाजार समिती प्रशासन, व्यापार्यांच्या संयुक्त बैठकीत आ. संग्राम जगताप यांचे निर्देश अहमदनगर | नगर सह्याद्री नगरच्या बाजार समितीच्या आवाराती...
बाजार समिती प्रशासन, व्यापार्यांच्या संयुक्त बैठकीत आ. संग्राम जगताप यांचे निर्देश
अहमदनगर | नगर सह्याद्री
नगरच्या बाजार समितीच्या आवारातील व्यापारी वर्गाला होणारा त्रास, अडी अडचणी सोडविण्याकडे बाजार समिती प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष या पार्श्वभूमीवर व्यापार्यांनी केलेल्या तक्रारीवरून आ.संग्राम जगताप यांनी व्यापारी आणि बाजार समिती प्रशासन यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीस बाजार समिती प्रशासक रत्नाळे, सचिव अभय भिसे यांच्यासह राजेंद्र चोपडा तसेच व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवाळीच्या सणासुदीच्या काळात दुकानात जाऊन जाचक तपासणी थांबवावी तसेच नगर परिसरात चिचोंडी, वाळकी, रूईछत्तीशी परिसरात काही व्यापारी थेट शेतकर्यांशी व्यवहार करत आहेत. त्यामुळे बाजार समितीत आवक कमी होते तसेच येथील व्यापार्यांचेही नुकसान होत आहे. याबाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी आ.जगताप यांनी केली. खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या बैठकीत व्यापारी वर्गाला दिलासा देणारे निर्णय झाल्याने व्यापारी वर्गाच्या वतीने राजेंद्र चोपडा यांनी आ.जगताप यांच्यासह बाजार समिती प्रशासनाचे आभार मानले.
या बैठकीस योगेश चंगेडिया, विजय गांधी, ललित गुगळे, अजय फिरोदिया, राजमल चंगेडिया, शांतीलाल गुगळे, बाळूशेठ बोथरा, गोपाल मणियार, पप्पूशेठ बोगावत, थोरात पाटील, किसन गांधी आदींसह व्यापारी उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी बाजार समिती प्रशासनाचे काही अधिकारी अचानक व्यापार्यांच्या दुकानात जाऊन वह्या, चोपड्या, संगणक तपासणीसाठी आक्रमक भूमिका घेत होते. यामुळे व्यापारी वर्गाने आ.जगताप यांची भेट घेऊन अडीअडचणी मांडल्या. त्यानुसार आ. जगताप यांनी संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी व्यापारी वर्गाला विनाकारण त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत व्यापारी वर्गाचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
COMMENTS