अहमदनगर | नगर सह्याद्री केवळ ३ वर्षाच्या वैद्यकीय सेवेत स्तर ५ आवृत्तिचे फाइनल एन ए बी एच प्रमाणपत्र मिळल्यामुळे साईदीप हॉस्पिटल ने देशात अ...
केवळ ३ वर्षाच्या वैद्यकीय सेवेत स्तर ५ आवृत्तिचे फाइनल एन ए बी एच प्रमाणपत्र मिळल्यामुळे साईदीप हॉस्पिटल ने देशात अव्वल स्थान मिळविण्याचा कीर्तिमान स्थापित केला आहे. यामुळे नगर चे सुद्धा देशात नावलौकिक झाले आहे असे गौरव उदगार साईदीप हॉस्पिटल चे चेअरमन डॉटर दीपक यांनी व्यक्त केले.
साईदीप हॉस्पिटल ने अल्पवधित म्हणजे केवल ३ वर्षात आपले नाव वैद्यकीय इतिहासात कोरले आहे. याचे आभार प्रदर्शन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ड़ॉ. दीपक बोलत होते. यावेळी जेष्ठ संचालक ड़ॉ. आर. आर. धूत, ड़ॉ. श्यामसुंदर केकड़े, ड़ॉ. निसार शेख, ड़ॉ. रविंद्र सोमाणी, ड़ॉ. कैलाश झालानी, ड़ॉ. हरमीत कथूरिया, ड़ॉ. व्ही. एन. देशपांडे, ड़ॉ. एस. एम. इक़बाल, ड़ॉ. अनिल कुर्हाडेे, ड़ॉ. किरण दीपक, ड़ॉ. राहुल धूत, ड़ॉ. वैशाली किरण, ड़ॉ. संगीता कुलकर्णी, ज्योति दीपक ड़ॉ. अश्विन झालानी, ड़ॉ. पायल धूत, ड़ॉ श्रीधर बधें, ड़ॉ. भूषण खर्चे,़ डॉ. रोहित धूत, ड़ॉ. धनंजय वाघ, ड़ॉ. सुमा वाघ, ड़ॉ. शिरीष कुलकर्णी, ड़ॉ. साहिल कुलकर्णी, ड़ॉ. माधवी कुलकर्णी, व हॉस्पिटल मधील सर्व अधिकारी, विभागप्रमुख, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
ड़ॉ. दीपक यांनी सांगितले की याचे संपूर्ण श्रेय हॉस्पिटल चे कर्मचारी, अधिकारी व सर्व संचालक यांचेच आहे. राष्ट्रीय स्तरावर ५ व्या आवृत्तिचे राष्ट्रीय अधिस्वीकृति वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र प्राप्त करणारे अव्वल हॉस्पिटल म्हणून नावलौकिक मिळवले आहे. यामुळे अहमदनगर चे सुद्धा नाव देशात अव्वल म्हणून कोरले गेले आहे. नगरमध्ये १३ मजली ऊंच इमारत बांधून सर्व वैद्यकीय सेवा ज्याला आधुनिक तंत्रज्ञानची साथ दिल्याने व सर्व वैद्यकीय उपचार एकाच छताखाली उपलब्ध केले. गेल्या ३ वर्षात हजारो समाधानी बरे झालेले रुग्ण, ज्यांना अचूक निदान आणि योग्य उपचार मिळाले सोबत स्वच्छता आणि तत्पर वैद्यकीय सेवा देण्यात हॉस्पिटल चे सर्व डॉटर्स, नर्सिंग स्टाफ, सर्व विभागाचे कर्मचारी त्यांचे विभागप्रमुख यानी कुठलाही आळस अथवा कंटाळा न करता आपल्या कार्याचे पालन केले. यामुळे हॉस्पिटलला कमी कालावधीत हे स्तर ५ चे प्रमाणपत्र प्राप्त झाले. यावेळी साईदीप हेल्थ केयर ट्रस्ट च्या सर्व संचालिका नंदा सोमाणी, ज्योति दीपक, शोभा धूत, अनिता झालानी, रोहिणी कुर्हाडे, ड़ॉ. सीमा शेख, ड़ॉ. रजिया निसार, अंजु कथूरिया, सुनीता देशपांडे उपस्थित होते. यावेळी वैद्यकीय प्रशासक ड़ॉ. ऋषिकेश कालगांवकर यांनी सूत्र संचालन केले व विलास काळभोर यानी आभार मानले.
COMMENTS