शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे यांचा आत्मविश्वास पारनेर | नगर सह्याद्री जिल्हा प्राथमिक शिक्षक व विकास मंडळाची निवडणूक सध्या सुर...
शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे यांचा आत्मविश्वास
पारनेर | नगर सह्याद्रीजिल्हा प्राथमिक शिक्षक व विकास मंडळाची निवडणूक सध्या सुरू असून या निमित्ताने प्रचारामध्ये फिरत असताना जिल्हाभरामध्ये सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी दिली आहे. अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेमध्ये व विकास मंडळामध्ये गेली सहा वर्षांपूर्वी रावसाहेब रोहोकले गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली सत्ता परिवर्तन होऊन जिल्हाभरातील प्राथमिक शिक्षकांनी रावसाहेब रोहोकले गुरुजी यांच्यावर विश्वास दाखवून संचालक मंडळ व विश्वस्त मंडळ निवडून दिले होते. पहिली साडेतीन वर्ष शिक्षक बँकेचा कारभार करत असताना गुरुजी व संचालक मंडळाने अत्यंत काटकसरीने कारभार करून बँक सुस्थितीत आणण्याचे प्रथम कार्य केले. ज्या बँकेजवळ कर्ज वितरण करण्यासाठी पैसा शिल्लक नव्हता, त्या बँकेमध्ये कर्ज रक्कम वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. अनावश्यक खर्च कमी करून गुरुजींनी कर्जावरील व्याजदर कमी करण्यास सुरुवात केली. या साडेतीन वर्षांच्या कालखंडामध्ये संचालक मंडळावर एकही रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप विरोधकांना देखील करता आला नाही.
गेली ९५ वर्षांमध्ये सभासद हिताची एकही योजना कोणत्याही संचालक मंडळाला आणता आली नाही, मात्र गुरुजींच्या व संचालक मंडळाच्या संकल्पनेतून अनेक सभासद हिताच्या योजना बँकेमध्ये आल्या. त्याच्यामध्ये प्रामुख्याने कुटुंब आधार योजना, कन्यारत्न योजना, दुर्धर आजाराने आजारी असणारे शिक्षकांना २५ हजार रुपये मदत योजना, दोंदे पारितोषिकाच्या रकमेमध्ये भरघोस वाढ इतकेच नव्हे तर ज्या बँकेमध्ये सभासदांना कायम ठेवीवरील व्याजदर व डिव्हीडंड अतिशय कमी मिळत होता, त्या बँकेमध्ये नफा वाढवून टप्प्याटप्प्याने डिव्हिडंड व कायम ठेवीवरील व्याजदर वाढविण्यासाठी गुरुजी व संचालक मंडळाने प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र साडेतीन वर्षांनंतर संचालक मंडळामध्ये फूट पाडण्यामध्ये काही मंडळी यशस्वी झाली. नंतर तीन वर्षांमध्ये संचालक मंडळावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले. या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या शासनस्तरावरुन अनेक चौकशी देखील झाल्या.
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेने वेळोवेळी प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर आंदोलने करून शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे कोकण पुरग्रस्त मदत, आदिवासी बांधवांना आणि वृध्दाश्रमांमध्ये दिवाळी फराळ वाटप, आळकुटी येथील भंडारी भगिनींना एक लाख तीस हजाराची आर्थिक मदत, कोरोना संसर्ग कालावधीमध्ये प्राथमिक शिक्षकांसाठी केलेले लसीकरणाचे कार्य यासारख्या सामाजिक उपक्रमामुळे प्राथमिक शिक्षकांची खर्या अर्थाने पत आणि प्रतिष्ठा वाढवण्याचे काम शिक्षक परिषद व रावसाहेब रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाऊली मंडळांने केलेले आहे. केवळ शिक्षक बँक व विकास मंडळाच्या निवडणुकीसाठी कामकाज न करता सातत्याने समाजामध्ये राहण्याचे काम शिक्षक परिषद गुरुमाऊली मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेले आहे. निवडणुकीच्या कालखंडामध्ये तळागाळातील प्राथमिक शिक्षकापर्यंत पोहोचण्याचे व रावसाहेब रोहोकले गुरुजी यांचे विचार व तत्व त्यांना समजावून सांगण्याची भूमिका प्रत्येक कार्यकर्त्यांने निभावलेली आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये निश्चितच जिल्ह्यातील सर्वसामान्य वाडीवस्तीवर काम करणारा प्राथमिक शिक्षक पुन्हा एकदा गुरुजींच्या विचारांना व तत्वांना मानणार्या संचालक मंडळाला संधी देणार आहे, असे प्रतिपादन शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी केले आहे.
COMMENTS