सरपंच विक्रमसिंह कळमकर, उपसरपंच वैशाली करंजुले यांची माहिती सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथे केंद्र शासनाच्या जल...
सरपंच विक्रमसिंह कळमकर, उपसरपंच वैशाली करंजुले यांची माहिती
सुपा | नगर सह्याद्रीपारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथे केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला असल्याची माहिती पाडळी रांजणगावचे सरपंच तथा राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर व उपसरपंच वैशाली करंजुले यांनी दिली.
पाडळी रांजणगाव हे गाव कुकडी कालव्याच्या लाभक्षेत्रात आहे परंतु सक्षम पाणी योजने अभावी गावाला उन्हाळ्यात नेहमीच पाणी टंचाई चा सामना करावा लागतो, त्यामुळे ग्रामपंचायतच्या सततच्या मागणीनुसार आमदार नीलेश लंके यांनी केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन योजनेत पाडळी रांजणगावचा समावेश केल्याने पाणी पुरवठा योजनेसाठी दोन कोटींचा भरीव निधी मंजूर झाला आहे. या निधीतून पाडळी रांजणगाव येथे ६५ हजार लिटर क्षमतेची टाकी तसेच गावठाण, उबाळे मळा, बेंद वस्ती, घडगा, जाधव वस्ती, उघडे वस्तीसह इतर वस्त्यांना पाणी वितरण व्यवस्था त्याचप्रमाणे कळमकरवाडी येथेही ६० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, घरोघरी पाणी वितरणव्यवस्था, पंपगृह, वीज कनेशन आदी कामे पार पडणार आहेत. पाणी पुरवठा योजनेसाठी मोठा निधी मंजूर झाल्याने आमदार नीलेश लंके व ग्रामपंचायतच्या पदाधिकार्यांचे ग्रामस्थांमधून कौतुक केले जात आहे.
COMMENTS