अहमदनगर | नगर सह्याद्री जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची बदली झाली असून राकेश ओला यांची जिल्हा पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आ...
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची बदली झाली असून राकेश ओला यांची जिल्हा पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ओला नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत होते.
ऑक्टोबर २०२० मध्ये पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची सोलापूर येथून नगरला बदली झाली होती. गेल्या दोन वर्षापासून मनोज पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले तक्रार अर्ज आणि गुन्हे निकाली काढण्यावर भर दिला होता. यात ते यशस्वी देखील झाले. बदलीनंतर पाटील यांना नियुक्ती देण्यात आली नसून त्यांच्या नियुक्तीचे स्वतंत्र आदेश पारित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, पोलिस अधीक्षक राकेश ओला यांचा प्रशिक्षणार्थी कार्यकाळ जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे गेला. त्याठिकाणी त्यांनी पोलिस उपअधिक्षक म्हणून काम पाहिले होते. आधी काम केलेले असल्याने ओला यांना जिल्हा नवा नाही.
COMMENTS