अरुणोदय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत दंतरोग व मेंदू रोग तपासणी शिबिराचे उद्घाटन अहमदनगर | नगर सह्याद्री अरुणोदय सुपर स्पेशलिटी हॉस्पिट...
अरुणोदय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत दंतरोग व मेंदू रोग तपासणी शिबिराचे उद्घाटन
अहमदनगर | नगर सह्याद्रीअरुणोदय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल ने शुभारंभापूर्वी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करून आरोग्य सेवेतील सामाजिक काम कौतुकास्पद आहे. रुग्णांनी आजाराचे लक्षण दिसताच ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करून डॉटरांच्या सल्ल्यानुसार उपचार करून घ्यावेत आरोग्य विषयक समाजामध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. अरुणोदय हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य शिबिरातून आजारपणाबद्दल जनजागृती करावी. कोरोना काळामध्ये आ. संग्राम जगताप यांनी शहरामध्ये रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यासाठी केलेले काम कौतुकास्पद आहे. सर्वसामान्य रुग्णांना आरोग्य सुविधा चांगल्या पद्धतीने मिळावेत यासाठी अरुणोदय हॉस्पिटल ने आरोग्य सेवेत सुरू केलेली कार्य कौतुकास्पद आहे. नागरिकांनी आहार लाईफ स्टाईल बदलली पाहिजे आहार तज्ञांच्या सल्ल्याने चांगला आहार घ्यावा सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा देण्याचे काम अरुणोदय हॉस्पिटल ने करावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी यावेळी केले.
अरुणोदय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीने मोफत दंतरोग व मेंदू रोग तपासणी व उपचार शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आ. संग्राम जगताप, न्यूरो सर्जन डॉटर सचिन चेमटे पाटील, संचालक डॉ. शशिकांत फाटके, डॉ. वंदनाताई फाटके, संजय असनानी, डॉ. हरीश सलोजा, डॉ. तुषार तनपुरे, डॉ. अश्विनी पवार, नगरसेवक प्रकाश भागानगरे, मंत्री पांडुळे, अभिजीत खोसे, भाऊसाहेब पांडुळे,अलका मुंदडा,मा.क्रीडा अधिकारी अजय पवार आदी उपस्थित होते.
न्यूरोसर्जन डॉ. सचिन चेमटे पाटील म्हणाले की, शिबिराच्या माध्यमातून रुग्णांना आरोग्य बद्दल माहिती मिळते रुग्णांची तपासणी केल्यानंतर आजाराचे निदान कळले जाते व त्यानंतर उपचार करणे शय होते. योग्यरित्या रुग्णांवर वेळेवर उपचार झाल्यास रुग्णांचा जीव वाचला जाऊ शकतो. अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ने सुसज्ज अशी आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली आहे पुणे मुंबई सरख्या आरोग्य सुविधा आता एका छता खाली नगरमध्ये मिळणार आहे सर्वसामान्य रुग्णांना आरोग्य शिबिरातून आधार मिळण्याचे काम होत असते असे ते म्हणाले.
यावेळी डॉ. शशिकांत फाटके म्हणाले की, अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दंतरोग व मेंदू रोग मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. लहान मुलांचे व वृध्दांचे हलणारे दात काढणे, मुख कर्करोग तपासणी व उपचार हिरड्यांचे दातांचे आजार, दंतव्यंग उपचार,लहान मुलांचे दातांचे उपचार,रूट कॅनॉल च्या समस्या,कृत्रिम दंतरोपन तोंडाचे अल्सर संबंधीत आजार तपासणी व उपचार शिवीरात डॉ. हरीष सलुजा, डॉ. संजय आसनानी, डॉ. सौ. वंदनाताई फाटके, डॉ. अभिषेक मुळे,डॉ. श्रदधा धोत्रे, डॉ. अश्विनी जाधव, डॉ. तन्वी भंडारे यांच्या मार्गर्शनाखाली संपन्न झाले.तसेच पुणे येथील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ.सचिन चेमटे यांच्या मार्गदर्शनाखाली मेंदू रोग व तपासणी शिबिर संपन्न झाले असे ते म्हणाले.
यावेळी डॉ. वंदनाताई फाटके म्हणाल्या की, लवकरच अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य जीवनदायी योजना सुरू होणार त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना मोफत उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळणार आहे. आत्तापर्यंत ३ मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये शेकडो रुग्णांनी याचा लाभ घेवून उपचार केले आहे. असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन लिगडे यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ.तुषार तनपुरे यांनी मानले.
COMMENTS