मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. स...
मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. इराणमध्ये सुरु असलेल्या हिजाबच्या वादाला आणि विरोधाला प्रियांकानं पाठिंबा दिल्यापासून तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. अनेकांनी प्रियांकाला ढोंगी म्हटले आहे. प्रियांकानं इराणमधील ज्या महिलांनी हिजाबच्या विरोधात कसे धाडस दाखवले आणि आवाज उठवला त्यांचे कौतुक केले. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रियांकानं तिचं मत मांडलं पण त्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर नेटकरी प्रियंकावर खूपच आगपखड करताना दिसत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की प्रियंका भारतीयांना सोडून प्रत्येक देशातील लोकांना पाठिंबा देण्यासाठी सज्ज असते. नेटकर्यांचे म्हणणे आहे की प्रियंकाला या गोष्टीचं काही घेणंदेणं नाही की आपल्या भारत देशात काय चाललंय. एका नेटकर्यानं बिलकिस बानोचं उदाहरण देत लिहिलं आहे की, ’प्रियांकानं इराणच्या महिलांप्रती जे समर्थन दिलं आहे,ते चांगलच आहे पण बिलकिस बानोसोबत जे घडलं तसंच आपल्या भारत देशातील इतर महिलांसोबत जे घडतंय त्यावर मौन बाळगणं तिला शोभतं का. त्यावर तिनं कधीच आवाज उठवला नाही. यावर खरंच विचार व्हायला हवा’. नेटकर्यांची तक्रार आहे की प्रियांका नेहमी इतर देशातील समस्यांवर आवाज उठवते पण आपल्या भारतातील महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलताना मात्र तिला त्रास होतो गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलीत बिलकिस बानोवर गँगरेप झाला होता आणि त्यावेळी तिच्या नजरेसमोर कुटुंबातील सात सदस्यांची हत्या करण्यात आली.
COMMENTS