कृषी विभागामार्फत पंचनामा करण्याचे तहसिलदारांचे आदेश सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यात गेल्या काही महिन्यापासुन सतत पाऊस पडत असल्याने...
कृषी विभागामार्फत पंचनामा करण्याचे तहसिलदारांचे आदेश
सुपा | नगर सह्याद्रीपारनेर तालुक्यात गेल्या काही महिन्यापासुन सतत पाऊस पडत असल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. तालुयात ओला दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे.
जुन महिन्यापासुन पारनेर तालुक्यात आज अखेर सातत्याने जोरदार पाऊस पडत आहे. पावसाने चालु वर्षाची सरासरी केव्हाच ओलांडली आहे. या सततच्या पावसाने खरिपाच्या व रब्बी पिकांचे मात्रे झाले. तसेच रब्बी हंगामही धोयात आला आहे. भाजीपाला पिकेही सडून गेले तर फुल शेतीही कोलमडून गेली. एकंदरीतच येवढा पाऊस होऊनही शेतकर्यांच्या पदरात काहीच पडले नाही. उलट खते बि बीयाणे औषधे मजुरी हे सर्व करताना बळीराजा आजुनच कर्जबाजारी झाला आहे. ऑटोबर महिना अर्धा संपत आला आसताना देखील रोज जोरदार पाऊस पडत आहे. हे प्रमाण गेल्या महिना भरापासुन खुपच आसुन यामुळे शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेल्या आठ दहा दिवसापासून पारनेर तालुयात जोरदार पर्जन्य वृष्टी होत आहे. हातातील सोयाबीन पीक कढणी वाचून तसेच वावरात पावसाच्या पाण्यात सडून चालले आहे. जनावरांना शिवारातील मका, कडवळ खाद्य आणू शकत नाही. सर्वत्र जमिनीमध्ये पाणीच पाणी दिसून येत आहे. सर्व जमीनी ऊपळल्या असल्याने कुठलीच मशागत शेतकरी करूच शकत नसल्यामुळे सर्वत्र सर्व जमीनीवर गवताचा गुडघ्यापर्यंत वाढलेला थर पहावयास मिळत आहे. भाजीपाला पिके जागेवरच सडून गेली असून फुलशेतीही रोजच्या पावसाने कोलमडून पडली आहे.
सततच्या व जोरदार पावसाने जमीन नापीकी व ओल्या दुष्काळसदृश परिस्थितीत निर्माण झाली आहे. ऐरणीतील कांदा सडून गेला तर आहे. तसेच कांद्याची ऊगवलेली रोपे सडून गेली आहेत. यावर्षी दिवाळी चांगली होईल असे वाटत असताना पावसाने शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे शेतकरी वर्गातुन तालुयात ओला दुष्काळ जाहिर करून शेतमालाचे सरसकट पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे. याबाबत पारनेरचे तहसिलदार आवळकंठे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कृषी विभागामार्फत गावोगावातील कृषी सहाय्यकाच्या मदतीने जिथे तक्रारी आल्या असतील तेथे पंचनामे करण्याचे आदेश दिले असुन नुकसानग्रस्थ शेतकर्यांनी कृषी साह्यकांच्या मदतीने नुकसान झालेल्या शेतमालाचे पंचनामे करून घ्यावेत असे तहसिलदारांनी सांगितले.
COMMENTS