पोलिस निरीक्षक राऊत यांना पत्रकार संघाचे निवेदन निघोज | नगर सह्याद्री शिरुर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांना टाकळी हाजी ये...
पोलिस निरीक्षक राऊत यांना पत्रकार संघाचे निवेदन
निघोज | नगर सह्याद्रीशिरुर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांना टाकळी हाजी येथील अवैध धंदे करणार्या व्यक्तींनी शिवीगाळ करत धमकी दिल्याचे निवेदन शिरुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आले.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, सुनील भांडवलकर, मदन काळे, के. डी. गव्हाणे, प्रविण गायकवाड, मुकुंद ढोबळे, समन्वयक पोपट पाचंगे, धर्मा मैड, राजाराम गायकवाड, ज्ञानेश्वर मिडगुले, शरद राजगुरू, सिकंदर तांबोळी, सतिश धुमाळ, साहेबराव लोखंडे, मनिषा राजगुरु आदी उपस्थित होते. यावेळी पोलिस निरीक्षक राऊत यांनी उपस्थित पत्रकारांशी सकारात्मक चर्चा करत सखोल माहिती घेत संबंधितावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
COMMENTS